शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दंडव्याजासह घरफाळ्याची वसुली

By admin | Updated: September 5, 2015 00:09 IST

आयुक्तांची माहिती : चालू वर्षाच्या घरफाळा बिलातूनच वसुलीच्या नोटिसा

कोल्हापूर : घरफाळ्याच्या थकबाकीवरील दंडव्याजात महापालिकेतील ‘दानशूर’ अधिकाऱ्यांनी दिलेली सूट मिळकतधारकांकडून वसूल करण्याच्या निर्णय आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला असून, चालू वर्षाच्या घरफाळा बिलातूनच वसुलीच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत. यासाठी चारही विभागीय कार्यालयांत विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, आवश्यकता वाटल्यास सुनावणीही घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. घरफाळा थकबाकीवरील दंडव्याजात कोणालाही सूट दिली जाणार नाही. गेल्या चार वर्षांत ज्यांचे दंडव्याज माफ झाले, त्यांच्याकडून ते वसूल केले जाणार आहे. चालू मागणी बिलात या सूट देण्यात आलेल्या रकमा थकबाकीच्या स्वरूपात समाविष्ट करून नवीन मागणी बिले देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्यांच्या बिलात सूट देण्यात आलेल्या दंडव्याज रकमेबाबत शंका असेल, तर त्यावर चारही विभागीय कार्यालयांत विशेष कर्मचाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन मिळकतधारकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. काही मोठ्या रकमांबाबतीत उपायुक्तांमार्फतही सुनावणी घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. तीन कोटींची सूट दिल्याचे स्पष्ट महानगरपालिकेच्या सात अधिकारी व ६९ कर्मचाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत २ कोटी ९१ लाख रुपयांचे दंडव्याज माफ केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. एखाद्या व्यक्तीने घरफाळा वेळेत भरला नाही आणि त्यामुळे थकबाकी राहिली तर थकबाकीवर अठरा टक्के दंडव्याज आकारण्यात येते; परंतु हे दंडव्याज जास्त होत असल्याने ते कमीत कमी करावे, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात होती; परंतु प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली होती. बिलंदर अधिकारी कारणीभूत घरफाळा विभागात काही विशिष्ट अधिकाऱ्यांचाच जास्त इंटरेस्ट असायचा. एक अधिकारी आजही घरफाळा विभागात काम करण्यास इच्छुक होता. त्यामुळे त्याने सध्याच्या अधिकाऱ्यास बदनाम करण्याच्या हेतूने एक प्रकरण उघडकीस येईल यासाठी प्रयत्न केले; परंतु हा अधिकारीही शेवटी घोटाळ्यात सापडला. आपल्याला पाहिजे तशी कायद्यातील पळवाट शोधण्यात हा ‘कायदेपंडित’ विशेष पटाईत आहे. त्यामुळे वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी बसली की मग आपल्याला पाहिजे तसे कामकाज करण्यात तो मोकळा असायचा.