प्रथम शहीद अनिकेत मोळे यांच्या स्मारकाला अभिवादन करून झाले. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय संचालक प्रा. डॉ. केशव राजपुरे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती देत शहीद जवान अनिकेत मोळे यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमात जयहिंद फाउंडेशनच्या वतीने शहीद जवान यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, वीरपत्नी यांना साडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख एकवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जयहिंद फाउंडेशन कोल्हापूरचे अमितकुमार पाटील, शेखर खामकर, सुशांत पाटील, सूरज मडके, रूपेश पेडणेकर, अरविंद पाटील, आजी-माजी सैनिक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}