पदव्यांची होळी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:12+5:302021-04-04T04:24:12+5:30

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सेवा कायम करावी, असा न्यायालयाने दिलेला आदेश वेळोवेळी डावलून प्रतिवादी ...

Holi of degrees | पदव्यांची होळी करणार

पदव्यांची होळी करणार

चंदगड :

हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सेवा कायम करावी, असा न्यायालयाने दिलेला आदेश वेळोवेळी डावलून प्रतिवादी संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ जाणीवपूर्वक न्यायालयीन आदेशांचा मनमानी अर्थ काढून अध्यापनाच्या सेवेपासून अलिप्त ठेवून अन्याय केल्याच्या निषेधार्थ प्रा. डॉ. नागेंद्र जाधव आपल्या पदव्यांची होळी करणार आहेत.

६ एप्रिल,२०२१ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या ५६ व्या पदवीदान दीक्षांत समारंभात विद्यापीठाने दिलेल्या पदव्यांची जाहीर होळी करून अन्यायाचा तीव्र निषेध करणार आहेत.

जाधव हे हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात २१ जून २००२ पासून इतिहास विषयाचे अधिव्याख्याते म्हणून कार्यरत असून, त्यांची सेवा नियमित करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात त्यांनी एकूण चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशात त्यांची सेवा पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत स्पष्ट आदेश देऊनही सर्व प्रतिवादी संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ जाणीवपूर्वक न्यायालयीन आदेशांचा मनमानी अर्थ काढून जाधव यांना अध्यापनाच्या सेवेपासून अल्पित ठेवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

--------------------------

* प्रा. नागेंद्र जाधव : ०३०४२०२१-गड-०२

Web Title: Holi of degrees