शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: August 23, 2015 00:40 IST

खारेपाटण येथील प्रकार : रिक्षाचालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक, महामार्गावर थरार

खारेपाटण / कणकवली : दारू वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून खारेपाटण येथील रिक्षा अडविण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केला. खासगी गाडीतून आलेल्या साध्या वेशातील अधिकाऱ्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविल्याने त्यांना ‘लुटेरे’ समजून खारेपाटणवासीयांनी बेदम चोपले. शुक्रवारी रात्री महामार्गावर हा थरार घडला. याप्रकरणी खारेपाटण येथील अकराजणांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला बेकायदा दारू वाहतूक करीत असलेल्या संशयास्पद रिक्षाची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे (वय ३६, रा. लांजा), कॉन्स्टेबल शेगर हे योगेश भिकाजी वाघदरे (३८) आणि महेश यशवंत देवरूखकर (२८) या दोन पंचांना घेऊन तळेरे येथे इर्टिगा कारमधून (एमएच ०८ झेड ३७३७) पाळत ठेवून होते. त्यांनी तळेरे येथून संशयास्पद रिक्षाचा पाठलाग केला. पाठलाग करतानाच रिक्षातील प्रवाशांनी फोन करून वारगाव येथे सहकाऱ्यांना बोलाविले. वारगाव येथे पथकाची इर्टिगा गाडी अडवून दहा ते पंधराजणांनी प्रमोद कांबळे यांच्यासह योगेश वाघदरे आणि महेश देवरूखकर यांना बेदम मारहाण केली. तसेच इर्टिगा गाडीही फोडण्यात आली. कॉन्स्टेबल शेगर यावेळी पळून गेला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारगाव येथे महामार्गावर उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाला थांबवून खारेपाटण किती अंतर आहे, असे चालकाला विचारले. त्यानंतर नडगिवे घाटीनजीक पुन्हा रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारमधील एकाने रिक्षाचालकाच्या हातावर दांडा मारला. रिक्षाचालकाने रिक्षा थांबविली असता प्रमोद कांबळे यांने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. तेव्हा रिक्षाचालकाने रिक्षा खारेपाटणच्या दिशेने पळविली. चालत्या रिक्षातून खारेपाटणमधील सहकाऱ्यांना बोलाविण्यात आले. महामार्गावर पटेल हार्डवेअर येथे इर्टिगा गाडी अडवून कारमधील प्रमोद कांबळे याच्यासह तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ग्रामस्थांनीच यानंतर तिघांनाही खारेपाटण तपासणी नाक्यावर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा ते उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील मोरे आपल्या पथकासह खारेपाटण येथे दाखल झाले. उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि काही युवकांना कणकवली पोलीस ठाण्यात आणले. अकराजणांना अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रिक्षाचालक लवू रामचंद्र तेली याच्यासह किरण भीमाप्पा बेळगे, गणेश दत्तात्रय झगडे, दैवत अंकुश शेटये, मनोहर बंडू तेली, वीरेंद्र बाळकृष्ण चिके, प्रमोद विश्वनाथ निग्रे, नीलेश रामचंद्र पराडकर, रवींद्र श्रीरंग जाधव, साजन दशरथ मोहिते, विजय अंकुश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, गैरकायदा जमाव करून मारहाण करणे, आदी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील किरण बेळगे हा अल्पवयीन असल्याने त्याला सावंतवाडी येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. लुटारू समजून मारहाण वारगाव येथे रिक्षाला थांबवून तेथून खारेपाटण किती लांब आहे, असे साध्या वेशातील अधिकाऱ्यांनी विचारले. तेथून पुन्हा नडगिवे घाटीच्या अलीकडे इर्टिगामधील अधिकाऱ्यांनी देवस्थानाकडे गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. गाडीतील एकाने रिक्षाचालकाच्या हातावर दांडा मारला. तसेच रिक्षावर दांडा मारून काच फोडण्यात आली. अधिकाऱ्यांनी भाड्याची इर्टिगा गाडी आणली होती. अधिकारी साध्या वेशात होते. तसेच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने ते लुटारू आहेत, असा सर्वांचा समज झाला आणि मारहाण केल्याचे खारेपाटणवासीयांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)