शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचा फेरआढावा घेऊन पुनर्लेखन गरजेचे

By admin | Updated: March 11, 2015 00:08 IST

सुमित्रा कुलकर्णी : विद्यापीठातील इतिहास विभागाच्या चर्चासत्राला प्रारंभ

कोल्हापूर : मराठा इतिहासाच्या तथ्यांचे सैद्धांतिकीकरण होणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून इतिहासाच्या बळकटीकरणासाठी इतिहास संशोधकांनी काम करावे, शिवाय त्यांनी इतिहासाचा फेरआढावा घेऊन त्याचे पुनर्लेखन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठा इतिहास संशोधक प्रा. डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांनी मंगळवारी येथे केले.विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अभ्यास केंद्रातर्फे आयोजित ‘मराठा इतिहास संशोधनातील प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे होते.डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, मराठा इतिहास म्हणजे केवळ राजे-महाराजांच्या कालखंडांचा अभ्यास असा संकुचित अर्थ घेऊ नये. त्या कालखंडाचा संपूर्ण भारतीय इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून सर्वंकष वेध अभिप्रेत आहे. त्यादृष्टीने पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन आणि ब्रिटिश संशोधकांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या ऐतिहासिक ऐवजांचे परिशीलन, त्या व्यतिरिक्त उपलब्ध स्रोत, संसाधनांच्या आधारावर इतिहासाचा फेरआढावा घेऊन पुनर्लेखन करून वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याकडे संशोधकांचा कटाक्ष असावा. डॉ. भोईटे म्हणाले, या राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून इतिहासाच्या संशोधनाकडे पाहण्याची नवी दृष्टी संशोधकांना प्राप्त होईल.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. माधव पाटील, बी. एन. सरदेसाई, जी. टी. कुलकर्णी, अमर सुतार, सदाशिव शिवदे, पद्मजा पाटील, नंदा पारेकर, अवनिश पाटील, आदी उपस्थित होते. नीलांबरी जगताप यांनी स्वागत केले. लीना ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. ए. लोहार यांनी आभार मानले.