शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: November 21, 2014 00:35 IST

इचलकरंजी नगराध्यक्षांना निवेदन : घरकुले ताब्यात देण्याची मागणी

इचलकरंजी : शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत बांधण्यात आलेली जयभीम व नेहरूनगर झोपडपट्टीमधील अपार्टमेंट पद्धतीची घरकुले अंतिम टप्प्यात आली असून, या इमारतींपैकी दोन इमारती पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना घरकुले ताब्यात द्यावीत; अन्यथा दोन आठवड्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन सत्तारूढ कॉँग्रेसचे नगरसेवक रवी रजपुते यांच्यासह चार नगरसेवकांनी आज, गुरुवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना दिले. यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार हे उपस्थित होते.शहरातील नेहरुनगर व जयभीम झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या झोपडपट्टीवासीयांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतींमध्ये घरकुले बांधून देण्यात येत आहेत. अत्यंत धिम्या पद्धतीने चालू असलेल्या या इमारतींपैकी काही इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून, इलेक्ट्रिक फिटिंग व सॅनिटेशनचे काम बाकी राहिले आहे. ही कामे तातडीने पूर्ण करुन नगरपालिकेने झोपडपट्टीवासीयांना या घरकुलांचा ताबा देणे आवश्यक आहे. मात्र, ही कामे प्रलंबित ठेवण्यात नगरपालिका पदाधिकारी व प्रशासन धन्यता मानीत असल्यामुळे झोपडपट्टीवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त ंहोत आहे.पूर्णत्वास गेलेल्या इमारतींपैकी फक्त दोन इमारतींवरच हे काम पूर्ण करून त्यामध्ये लाभार्थ्याच्या हिस्स्याची रक्कम भरणाऱ्यांना अनुक्रमाने घरकुले ताब्यात द्यावीत, अशी मागणी नगरसेवक रजपुते, नगरसेवक भाऊसाहेब आवळे, नगरसेविका रेखा रजपुते व माधुरी चव्हाण यांनी नगराध्यक्षांकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी झालेल्या चर्चेत घरकुले ताब्यात देण्यास ६ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. मात्र, नगरपालिकेने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. (प्रतिनिधी)