शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शेंडापार्क येथील कुष्ठधामच्या हेरिटेज वास्तू बेवारस; राजाराम छत्रपतींनी दिली होती ५५१ एकर जमीन, आता केवळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:29 IST

सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभागाने झटकली जबाबदारी

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर सात महिन्यांनंतर मार्च महिन्यात शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शेंडापार्क येथील कुष्ठधामच्या हेरिटेज वास्तूला पहाटे आग लागली. ती कोणी लावली याचे गौडबंगाल केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रमाणेच कायम आहे. यासंदर्भात फिर्याद दिली होती, मात्र या इमारतीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागानेही झटकल्यामुळे या वास्तूला सरकार दरबारी कोणी वालीच नसल्याने बेवारस झाल्याचे चित्र आहे.शेंडापार्क परिसरात १९४४ मध्ये राजाराम छत्रपतींनी कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी ५५१ एकर जमीन देऊन कुष्ठधामची स्थापना केली. आता केवळ ९७ एकर जमीन उपलब्ध आहे. याच जागेत कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कुष्ठधाम बांधले. मात्र गेल्या वर्षभरापासून येथील बाह्यरुग्ण विभाग बंद आहे. ६ ऑगस्ट २००७ रोजी तेथील १८ कर्मचाऱ्यांना इतरत्र वर्ग करून अन्नधान्य व औषधांचा पुरवठा थांबविला आहे. दरम्यान, मार्च २०२५ मध्ये या दुमजली इमारतीला आग लागल्याने त्यात दगडी इमारतीचे रुफ, जिना व आतील साहित्य जळून नष्ट झाले. यासंदर्भात युथ डेव्हलपमेंट फाऊंडेशनने ११ सप्टेंबर रोजी केलेल्या आंदोलनानंतर यातील गोआश्रम तसेच भटक्या गायींची व्यवस्था करणे अधिकार कक्षात येत नसल्याचा खुलासा जिल्हा परिषदेने केला आहे. याच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासकीय पातळीवर कोणीच पुढाकार घेत नाही. याची नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडील पीआरबी रजिस्टरला असून देखभाल व दुरुस्ती बांधकाम विभागाकडील अनुदानातून होते.

शेंडापार्क येथील कुष्ठधामातील कुष्ठ रुग्णांच्या शुश्रूषेकरिता जिल्हा परिषद सेवाभाव म्हणून सेवा दिली जाते. तेथील गोआश्रम व भटक्या गायींची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या अधिकारात नाही. -डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूरही वास्तू हेरिटेज आहे. याचा संवर्धन आराखडा, डागडुजीची कामे करण्यासाठी विचारणा केली असता, आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले आहे, तर बांधकाम विभागाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने याला सध्या वाली नाही. -राहुल चौधरी, अध्यक्ष, युथ डेव्हलपमेंट फाऊंडेशन.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's neglected leprosy center: Heritage structure abandoned, land dwindles.

Web Summary : Kolhapur's Shenda Park leprosy center, established in 1944, faces neglect. A fire damaged the heritage building, with responsibility unclaimed by authorities. Land allotted for leprosy patients has shrunk, services halted, and the structure remains without proper care.