शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कोल्हापूर: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार

By राजाराम लोंढे | Updated: August 9, 2022 17:52 IST

पंचगंगा नदीवरील तब्बल ७५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी पावसाचा जोर कमी झाला. मात्र, तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. संततधार पावसाने आज थोडी उघडीप दिली असली तरी अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या. जिल्ह्यात गगनबावड्यासह पाच तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली असून ७५ बंधारे पाण्याखाली गेल्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूरहून तळ कोकणाला जोडणारे दोन्ही मार्गावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे.काल, सोमवारी दिवसभर धुवाधार पाऊस कोसळत राहिला. रात्रीही पावसाचा जोर होता, मात्र आज, मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला. अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पावसाचा जोर असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ‘वारणा’ व ‘दूधगंगे’तून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पावसाने उघडीप दिली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.मंगळवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी ३६.७ फुटापर्यंत होती. त्यानंतर दुपारी एक पर्यंत ३७.७ फुटापर्यंत गेली. म्हणजे पावसाने विश्रांती घेतल्याने पाच तासात केवळ फुटाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. तब्बल ७५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

राधानगरीचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार

राधानगरी धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ९७ टक्के भरले होते, त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडू शकतात. पहाटे पाच वाजता आजरा तालुक्यातील ‘चित्री’ धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आतापर्यंत चार धरणे व एक लघु पाटबंधारे प्रकल्प भरले आहेत.

६९ इमारतींची पडझडजिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १ सार्वजनिक व ६८ खासगी मालमत्तांची पडझड होऊन २० लाख १४ हजारांचे नुकसान झाले आहे.

जोरदार वाऱ्याने पाऊस सरकलावाऱ्यांच्या दिशेवरच पावसाचे प्रमाण अवलंबून असते, साधारणता पूर्वीपासून वारे आणि पावसाचा ठोकताळा बांधला जातो. त्यानुसार पावसाबरोबर वारे वाहू लागले तर, पाऊस अधिक लागतो. कोरडे वारे वाहू लागले तर, पाऊस मागे सरकतो, असा अंदाज वर्तवला जातो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी