महिला भाविकाला हृदयविकाराचा धक्का

By Admin | Updated: October 18, 2015 01:21 IST2015-10-18T00:41:46+5:302015-10-18T01:21:51+5:30

मोबाईल हरवल्यामुळे पतीशी संपर्क नाही

Heart attack of the female devotee | महिला भाविकाला हृदयविकाराचा धक्का

महिला भाविकाला हृदयविकाराचा धक्का

कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेशाहून आलेल्या पी. विजयालक्ष्मी या महिलेला शनिवारी दर्शनरांगेतच हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना व्हाईट आर्मीच्या जवानांनी तातडीने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.
शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान पी. विजयालक्ष्मी या पती पी. सुब्बराव यांच्यासोबत अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या होत्या. महिला भाविकांची आणि पुरुषांची रांग वेगवेगळी असल्याने त्या महिलांच्या रांगेत थांबल्या. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. तेथे उपस्थित असलेले व्हाईट आर्मीचे सचिन शिंदे व मेघा शिंदे यांनी पी. विजयालक्ष्मी यांना रुग्णवाहिकेमधून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या गोंधळात विजयालक्ष्मी यांचा मोबाईल हरवल्यामुळे त्यांच्या पतीशी संपर्क होऊ शकला नाही.
मात्र, ही घटना कळताच देवस्थान समितीने ध्वनिक्षेपकावर सातत्याने त्यांचे पती पी. सुब्बराव यांच्या नावाचा पुकारा केला जात होता व त्यांना देवस्थान समितीशी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले जात होते. त्यांना मराठी भाषा कळली नाही तर अडचण येऊ नये म्हणून हिंदी, इंग्लिश अशा तीनही भाषांमध्येदेखील हे आवाहन केले जात होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. पी. विजयालक्ष्मी यांची प्रकृती स्थिर आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Heart attack of the female devotee