शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: मित्राला सांगूनच त्याने प्रेयसीचा खून केला अन् जंगलात स्वत:लाही संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:32 IST

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून करणाऱ्या सतीश यादवने तिला अन् स्वत:लाही संपवले

कोल्हापूर : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा खून करून स्वत:ही जीवन संपवणार असल्याचे सतीश मारुती यादव (वय २७, सध्या रा. शिवाजी पेठ, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री, ता. पन्हाळा) याने आधीच मित्राला सांगितले होते. मंगळवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास त्याने मित्राला फोन केला आणि अवघ्या अर्ध्या तासात प्रेयसीचा खून करून तो निघून गेला. बुधवारी (दि. ४) सकाळी त्याने शाहूवाडी तालुक्यातील कातळेवाडी-बांद्रेवाडी येथील धरणाजवळ झाडाला गळफास घेऊन स्वत:ला संपवले.तपास पथकातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव्ह इनमधील प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय २३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हिचा खून करण्यापूर्वी हल्लेखोर सतीश यादव हा मंगळवारी मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता. सकाळपासूनच तो दारूच्या नशेत होता. दुपारी दोनच्या सुमारास त्याने प्रकाश सुळेकर या मित्राला फोन केला. समीक्षाचा खून करून स्वत:ही जीवन संपवणार असल्याचे त्याने मित्राला सांगितले. त्यानुसार अर्ध्या तासातच त्याने सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात समीक्षाचा चाकूने भोसकून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू अंपले या दोघींना घरात कोंडून तो दुचाकीवरून निघून गेला.कोल्हापुरातून तो बाजार भोगाव येथे पोहोचला. तिथे एका मित्राकडून २०० रुपये घेतले. दुचाकीत पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्र अरुण सुतार याच्या घरी गेला. बुधवारी सकाळी घरातले कोणी उठण्यापूर्वीच तो दुचाकी घेऊन निघून गेला. काही वेळाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नांदारीत सुतार याच्या घरी पोहोचले होते. त्यांनी सुतार याला सोबत घेऊन दिवसभर सतीशचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर गुरुवारी सकाळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.शेतकऱ्यांना दिसला मृतदेहशेतात निघालेल्या शेतकऱ्यांना झाडाला लटकलेला मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती पोलिस पाटलांना दिली. त्यानंतर शाहूवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गांधीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तिथेच काही अंतरावर सतीशची दुचाकी होती. मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून त्याची दुचाकी आणि मोबाइल जप्त केला.

नातेवाइकांसह ४० जणांकडे चौकशीहल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांनी त्याच्या मोबाइलवर कॉल केलेल्या व्यक्तींची यादी काढली. त्याचे मित्र, नातेवाईक आणि पै-पाहुणे अशा ४० जणांकडे चौकशी केली. यातील २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शाहूवाडी, पन्हाळा आणि भुदरगड तालुक्यांत पोलिसांनी छापेमारी करून हल्लेखोरांचा शोध घेतला. जिल्ह्यातील सर्व लॉजची तपासणी करून २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस