घरात घुसून महिलांसह चौघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 06:45 PM2021-04-12T18:45:46+5:302021-04-12T18:46:55+5:30

Crimenews Police Kolhapur : गैरसमजातून बेकायदेशीरपणे घरात घुसून तीन महिलांसह चौघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील वाशी येथे घडला. या हल्ल्यात सुभाष विठ्ठल पुजारी, स्वाती विठ्ठल पुजारी, शितल सुभाष पुजारी, द्रौपदी विठ्ठल पुजारी (सर्व रा. वाशी) हे जखमी झाले. याप्रकरणी सहाजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

He broke into the house and beat up four people including a woman | घरात घुसून महिलांसह चौघांना मारहाण

घरात घुसून महिलांसह चौघांना मारहाण

Next
ठळक मुद्देघरात घुसून महिलांसह चौघांना मारहाण वाशी येथील प्रकार : सहाजणांवर गुन्हा

कोल्हापूर : गैरसमजातून बेकायदेशीरपणे घरात घुसून तीन महिलांसह चौघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील वाशी येथे घडला. या हल्ल्यात सुभाष विठ्ठल पुजारी, स्वाती विठ्ठल पुजारी, शितल सुभाष पुजारी, द्रौपदी विठ्ठल पुजारी (सर्व रा. वाशी) हे जखमी झाले. याप्रकरणी सहाजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजी आनंदा पुजारी व सुभाष पुजारी हे दोघे शेजारी राहतात. शुक्रवारी रात्री गैरसमजातून त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. यावेळी तानाजी पुजारी, आनंदा बापु पुजारी, पुनम तानाजी पुजारी, भारती आनंदा पुजारी, संभाजी आनंदा पुजारी, सचीन पाटील (सर्व रा. वाशी) यांनी सुभाष पुजारी याच्या घरात घुसून गोंधळ माजवला. त्यांनी चौघांवर हल्ला करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हल्ल्यात महिलांना केसाला पकडून त्यांना ओढत आणले. तसेच शितल पुजारी यांन ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोके भींतीवर आपटून त्यांना जखमी केले. यामध्ये ते बेशुध्द पडले. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी सहाजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: He broke into the house and beat up four people including a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.