शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस कराल रस्त्यावर, कारवाई होईल सर्वांवर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मध्यरात्री १२.०१ वाजता दुसरा दिवस सुरू झाला की फटाके वाजतात, जल्लोषही सुरू होतो. त्यावेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मध्यरात्री १२.०१ वाजता दुसरा दिवस सुरू झाला की फटाके वाजतात, जल्लोषही सुरू होतो. त्यावेळी समजायचे की, परिसरात आज कोणाचा तरी वाढदिवस आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भर रस्त्यात, चौकात दुचाकी अथवा चारचाकी वाहनावरच केक ठेवून वाढदिवस साजरा करण्याची सवय आजच्या तरुणाईला जडली आहे; पण काही गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांच्या वाढदिवस साजरा करताना चक्क तलवारीने केक कापणे, डीजेवर गाणी लावून जल्लोष करत परिसरात दहशत निर्माण केली जाते; पण सावधान... असे वागाल तर तुम्हावर पोलिसांत गुन्हा नोंद होईल, हातात बेड्या ठोकल्या जातील.

आजच्या तरुणाईत वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची नवी प्रवृत्ती आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावरच उभारून शोभेचे फुलबाजे, फटाके उडवून गाडीवरच केक कापून जल्लोष केला जात आहे. अशा पद्धतीने जल्लोष करणाऱ्या तरुणाईवर पोलीस गुन्हे नोंदवण्यापेक्षा त्यांना रस्त्यावरच ‘खाकी’चा प्रसाद देऊन पिटाळून लावतात, अगर पोलीस अधिनियम ११० कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. अतिउत्साही कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, ३७ (१) (३) याप्रमाणे गुन्हा नोंदवून दंड ठोठावला जातो; पण चौकात जल्लोष करताना तलवारीने केक कापून दहशत निर्माण करणाऱ्यांना मात्र कारावासाचा मार्ग दाखवला जातो. तलवारीने केक कापणाऱ्यावर कडक कारवाईचे वर्षातून सुमारे १० ते १२ गुन्हे दाखल होतात.

...तर गुन्हा दाखल

- रस्त्यावर वाहन उभे करून त्यावर केक कापणे.

- डीजे लावून रस्त्यावर जल्लोष करणे.

- मध्यरात्री फटाके वाजवणे.

- तलवारीने केक कापणे.

- मध्यरात्री पाचपेक्षा अधिक जण एकत्र येऊन जल्लोष करणे.

आर्म ॲक्टनुसार कारवाई

मध्यरात्रीच्या वेळी रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना त्याचा दुसऱ्याला त्रास होत असेल, तर त्यांच्याविरोधात पोलीस अधिनियम ११०, ११७ नुसार गुन्हा नोंदवला जातो, तर तलवारीने केक कापल्यास त्याच्यावर आर्म ॲक्टनुसार कारवाई होऊन शिक्षेची तरतूद आहे.

कोट...

तरुण मध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करतात. काही निरागस तरुणांना काठीचा प्रसाद, तर बहुतांशीवर प्रतिबंधात्मक गुन्हे नोंदवले जातात. दहशत माजवण्यासाठी रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्याला मात्र बेड्या ठोकल्या जातात. म्हणून रस्त्यावर वाढदिवस साजरा करू नये.

-मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर शहर