शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ यांची टीका अनाकलनीय - धनंजय महाडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आपण संघाची प्रगती आणि त्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले कल्याण हेच मुद्दे मांडत ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आपण संघाची प्रगती आणि त्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले कल्याण हेच मुद्दे मांडत आहे. कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही, तरीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याबद्दल केलेली टीका ही अनाकलनीय व खेदजनक असल्याचा पलटवार माजी खासदार धनंजय महाडीक यांनी पत्रकातून केला.

‘गोकुळ’च्या निवडणुकीचा प्रचार दोन्ही आघाड्यांकडून सुरू झाला आहे. चंदगड येथे झालेल्या सभेत धनंजय महाडीक यांनी विरोधी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. यावर धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, अन्यथा मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला होता. त्याला महाडीक यांनी प्रतिउत्तर दिले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने केलेले काम व प्रगतीचे मुद्दे मांडत आहे. कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही. तरीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले विधान खेदजनक आहे. गैरसमजुतीतून किंवा कुणीतरी दिशाभूल केल्याने त्यांनी आपल्यावर टीका केली असावी. तीन मंत्री, काही आमदार-खासदार यांनी एकत्र येऊन विरोधी आघाडी तयार केली आहे, याचाच अर्थ ‘गोकुळ’ उत्तम व सक्षमरीत्या चालला आहे, हे सिद्ध होते. हेच मांडण्याचा प्रयत्न केला, तरीही मंत्री मुश्रीफ यांनी आपल्याबद्दल बोलणे हा अनाकलनीय व अक्षम्य प्रकार असल्याचे धनंजय महाडीक यांनी पत्रकात म्हटले आहे.