शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

हमाली वाढीवरून बैठकीत खडाजंगी : काम बंद केल्याने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:26 PM

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ खरेदीदार व त्यांच्याकडील हमाल यांच्यात हमाली वाढीवरून सोमवारी झालेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. वाद वाढतच गेल्याने हमालांनी दुपारनंतरचे काम बंद केल्याने पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहमाली वाढीवरून बैठकीत खडाजंगी : काम बंद केल्याने तणावगूळ खरेदीदार, हमाल एकमेकांच्या अंगावर धावून

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ खरेदीदार व त्यांच्याकडील हमाल यांच्यात हमाली वाढीवरून सोमवारी झालेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. वाद वाढतच गेल्याने हमालांनी दुपारनंतरचे काम बंद केल्याने पेच निर्माण झाला आहे.गूळ विभागात खरेदीदारांकडे सुमारे ३५० हमाल कार्यरत आहेत. गुळाचा सौदा झाल्यानंतर रव्यांची शिलाई करणे, शिक्का मारणे आणि त्याची वाहतूक करण्याचे काम हे हमाल करतात. त्यासाठी रव्यामागे ५ रुपये ३० पैसे त्यांना हमाली दिली जाते.

खरेदीदार व हमाल यांच्यात २०१५ रोजी झालेल्या समझोता करारानुसार हमालीमध्ये दरवर्षी १० टक्के वाढ होते. सप्टेंबर ते आॅक्टोबर हा गूळ विभागाचा हंगाम गृहीत धरून आॅक्टोबरमध्ये वाढ दिली जाते; पण यंदा दोन महिन्यांपूर्वीच खरेदीदारांनी वाढ देणार नसल्याचे समितीला कळविले होते. वाढ दिली नाहीतर शुक्रवार (दि. १५)पासून काम बंद आंदोलनाचा इशारा हमाल संघटनेने दिला होता.

याबाबत सोमवारी दुपारी समितीत खरेदीदार व हमालांची बैठक घेण्यात आली. चर्चा सुरू असतानाच खरेदीदार आणि हमालांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली. त्यातून कामगार प्रतिनिधीच्या अंगावर काही खरेदीदार धावून गेल्याने गोंधळ उडाला. त्यातून एकमेकांच्या अंगावर गेल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

अखेर समितीचे सभापती बाबासो लाड, सचिव मोहन सालपे यांनी मध्यस्थी करीत दोघांना शांत केले; पण त्या रागातून हमालांनी दुपारपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याबाबत खरेदीदार प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, याबाबत आपण काहीच बोलणार नसल्याचे सांगितले.उद्या सौद्याचे भवितव्य अधांतरी!आज, मंगळवारी गूळ मार्केटला सुट्टी आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी सकाळी गुळाचा सौदा होणार का? याबाबत साशंकता आहे. हमाल व खरेदीदार आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर पेच निर्माण होऊ शकतो.

कराराप्रमाणे दरवाढीची मागणी आम्ही केली, पण ती दिली नाही. याबाबत समितीने बोलाविलेल्या बैठकीत कामगार प्रतिनिधीच्या अंगावर खरेदीदार धावून गेले. उद्या हमालांना मारहाण करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्या रागातून हमालांनी दुपारपासून काम बंद केले.- बाबूराव खोत ,संचालक, बाजार समिती

शेतकरी अगोदरच संकटात आहेत. त्यांच्या हिताचा विचार करून खरेदीदार आणि हमालांनी हा विषय फार ताणू नये. एकत्रित बसून तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.- मोहन सालपे,सचिव, बाजार समिती

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर