शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमध्ये सशस्त्र कमांडो घालणार गस्त

By admin | Updated: August 30, 2015 23:13 IST

लोकसहभागातून मेहनताना : नागरिक, व्यापारी, पोलीस यांच्या सुरक्षा बैठकीत निर्णय

मुरगूड : सीमा भागातील महत्त्वाचे शहर व बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरगूड शहराच्या सुरक्षिततेसाठी आता सशस्त्र कमांडो रात्रभर गस्त घालणार आहेत. त्यांची नेमणूक पोलीस अधिकारी करणार असले तरी त्यांचा मेहनताना पतसंस्था, बँका व लोकसहभागातून देणगी गोळा करून देणार आहेत. जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून, पोलीस कर्मचारीही या उपक्रमात अग्रभागी असतील, असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत मस्के यांनी व्यक्त केला.गेल्या वर्षभरापासून मुरगूड शहरात छोट्या-मोठ्या चोरीपासून दरोडा टाकण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीस ठाणे व लक्ष्मी नारायण पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नारायण सभागृहात सुरक्षा बैठक झाली. उद्योगपती जवाहर शहा अध्यक्षस्थानी होते. शहरातील सर्व पतसंस्था, बँका, व्यापारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. मस्के म्हणाले, चोरट्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. शहरामध्ये महत्त्वाचे चौक, व्यापारी, बँका, संस्था, आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस कर्मचारीही रात्री गस्त घालणार आहेत. बाजारपेठेत सुरक्षेसाठी कमांडोची नियुक्ती केली जाणार असून, रात्री दहा ते पहाटेपर्यंत ते संपूर्ण बाजारपेठेत गस्त घालतील. आमचे कर्मचारी नेहमी त्यांच्या संपर्कात असतील. प्रायोगिक तत्त्वावरील हा उपक्रम यशस्वी झाल्यास संपूर्ण शहरात कमांडोची नेमणूक केली जाईल.शहा म्हणाले, या कमांडोचा खर्च लोकसहभागातून होणार असल्यामुळे प्रत्येक संस्थेने दरमहा किमान एक हजार रुपये देण्याचा ठराव संमत करून घ्यावा. पानटपरीधारक व दुकानदार यांनीही दरमहा ठरावीक रक्कम द्यावी. या पैशाच्या विनियोगासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.विरोधी पक्षनेते किरण गवाणकर म्हणाले, गस्तीच्या नावाखाली तरुणांनी घातलेला हैदोस हा निंदनीय आहे. त्याऐवजी कमांडो नियुक्तीचा निर्णय योग्य आहे. यावेळी उद्योगपती मोहन गुजर, चंद्रकांत माळवदे, मारुती कांबळे, पत्रकार अनिल पाटील यांची भाषणे झाली. पोलीस कर्मचारी बी. बी. मुळीक यांनी प्रास्ताविक केले.