शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणींच्या हाती खुरप्यांऐवजी बंदुका

By admin | Updated: August 25, 2014 22:13 IST

कायद्याचे रक्षक : उंब्रज पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील बारा शेतकरीकन्यांची मुंबई पोलीस दलात निवड

अजय जाधव -उंब्रज --ज्या हातात ‘खुरपे’ घेण्याशिवाय पर्यायच नव्हता, त्या हातात कायद्याचा दंडुका दिसणार नाही. उंब्रज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बारा तरुणींची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या रणरागिणी आता मुंबईकरांच्या सेवेत खाकी वर्दी घालून सज्ज होणार आहेत.ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. मुलींना नोकरी करणे याकडे अनेकदा समाजाचे नकारात्मक विधाने असतात. दहावी-बारावी झाली की लग्नाची तयारी ग्रामीण भागात सुरू असते. काहीजणी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात; परंतु घरातील लोकांचे ‘शुभमंगल’ उरकण्यासाठी प्रयत्न सुरू असतात.हल्ली ग्रामीण भागात झपाट्याने बदल होत आहे. ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत महिला विविध क्षेत्रांत अग्रभागी कार्य करत आहेत. यातच महिला पोलीस ही संकल्पना अजूनही ग्रामीण भागात रुजलेली नाही. तरीही उंब्रज परिसरातील बारा तरुणी महिला पोलीस म्हणून भरती झाल्या आहेत. भरतीप्रक्रियेची जाहिरात सुटल्यानंतर या तरुणी भरतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्याही प्रशिक्षण केंद्रात जाऊन मार्गदर्शन न घेता घरीच अभ्यास व शेतात सराव सुरू केला. यामध्ये कुटुंबीयांनीही त्यांना साथ दिली. गणेशोत्सवापूर्वीच त्या मुंबई पोलीस दलात रुजू होण्याची शक्यता आहे. आम्ही शेतात सराव करत असताना गावातीलच काही लोक नावे ठेवत होते. मुलींनी पोलिसांत कशाला जायचे, हा प्रश्न विचारत होते. मात्र, घरातील मंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशसेवा करण्याची संधी मिळाली.- श्रद्धा जाधव, पाडळी हेळगावशेत हेच खेळाचे मैदान...पोलीस भरतीत जायचे तर लेखी परीक्षाऐवढेच शारीरिक क्षमतेला महत्त्व आहे. यामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडीच्या चाचण्या देणे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे शेतात जाऊन धावण्याचा सराव केला. तर गोळा फेकसाठी गोळा व इतर साहित्य खरेदी करूनच सराव केला. यासाठी शेत हेच आमच्यासाठी खेळाचे मैदान होते, असे मत पाडळी हेळगाव येथील अश्विनी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पोलिसांचे लहानपणापासून आकर्षण होते. आज कर्मचारी म्हणून दाखल होत असले तरी अधिकारी होण्याचे स्वप्न मला शांत बसू देणार नाही. त्यामुळे अधिकारी होण्यासाठीचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.- सुप्रिया जाधव, पाडळी-हेळगाव