शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा आज, बाजारपेठा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी पहिला मुहूर्त व मराठी नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी अवघे शहर जणू रस्त्यावर लोटले ...

कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी पहिला मुहूर्त व मराठी नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी अवघे शहर जणू रस्त्यावर लोटले होते. साखरेच्या माळा, चाफ्याच्या फुलांचा हार, कडुलिंबाचे डहाळे, चिव्याची काठी यासह पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी रस्त्यावर, तर वस्तूंच्या बुकिंगसाठी शोरूम व दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होत होते.

मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याला दारात गुढी उभारली जाते. सूर्योदयापूर्वी चिव्याच्या काठीवर तांब्या ठेवून त्याला साडी, ब्लाऊज पीस, साखरेची माळ, चाफ्याच्या फुलांचा हार घातला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला जातो.

या मुहूर्तावर शुभकार्य केले, नव्या वस्तूची खरेदी केली की घरात समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मोबाईल, वाहनांची खरेदी केली जाते. त्यासाठी आधी बुकिंग करावे लागते.

सध्या कोरोना संसर्गामुळे रात्री आठ वाजताच दुकाने बंद होतात. त्यात निशवार व रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने दुकाने बंदच होती. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांत ग्राहकांची गर्दी उसळली होती. ऊन उतरल्यानंतर गर्दी वाढली होती. त्यामुळे शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, महापालिका चौक, पापाची तिकटी, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी या प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांची अलोट गर्दी होती.

--

फोटो नं १२०४२०२१-कोल-गुढीपाडवा

ओळ :

मराठी नववर्षारंभ असलेला गुढीपाडवा आज, मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्त कोल्हापुरातील शिंगोशी मार्केटमध्ये साखरेच्या माळा व फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

गुढीपाडवा ०१

यानिमित्त बाजारपेठेत आंब्याचीही मोठी आवक झाली आहे. (छाया : नसीर अत्तार)