शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: फायर स्टेशन इमारत दुर्घटनेप्रकरणी दोन्ही अभियंत्यांना निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:48 IST

शहरातील रस्त्यांसह सर्वच विकासकामांची बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी केवळ ठेकेदारावरच कारवाई नको तर त्याच्या दर्जाची तपासणी करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कनिष्ठ व उपशहर अभियंत्यांनाही निलंबित करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले. शहरातील रस्त्यांसह सर्वच विकासकामांची बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मंत्री आबिटकर यांनी दिले.कोल्हापूर महानगरपालिकेत मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री आबिटकर म्हणाले, फुलेवाडीतील अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. त्याचे कॉलम खाली कोसळतात यावरुच या कामाचा दर्जा लक्षात येतो. यात ठेकेदारावर कारवाई केली असली तरी कनिष्ठ व उपशहर अभियंता हेही तितकेच दोषी आहेत. त्यांनी कामाची गांभीर्यपूर्वक पाहणीच केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करा.शहरातील शंभर कोटींच्या रस्त्यांसह पूर्वीचे ९० कोटी रुपयांचे रस्ते, जिल्हा नियोजनमधील रस्त्यांची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करुन चौकशी करा. यात जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही आबिटकर यांनी दिले. यावेळी सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, आदिल फरास उपस्थित होते.पाणीपुरवठ्याच्या चौकशीसाठी समिती नेमून कारवाईशहरवासीयांना थेट पाईपलाईन योजनेचे पाणी ऐन सणात आठ दिवस मिळाले नाही. पाणीपुरवठा विभागाचे अनेक कर्मचारी-अधिकारी स्पॉटवर जातच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाणी का आले नाही याचा शोध घ्या, यासाठी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री आबिटकर यांनी दिले. पंप दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असताना त्यावर काय कारवाई केली असा सवालही आबिटकर यांनी विचारला.

खुल्या जागांची विक्री, महापालिका झोपली आहे का ?शहरातील महापालिकेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण करुन बांधकामे होत आहेत. काही गुंडांकडून त्या जागांची विक्री होत असतानाही महापालिका त्यावर काहीच कारवाई करत नसल्याचा मुद्दा राजेश क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिला. महापालिकेचे अधिकारीच यात सामील आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन चालवते की गुंड असा सवालही त्यांनी केला.केशवरावचे काम १ एप्रिलपर्यंत पूर्ण कराकेशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे आला आहे. सध्या हे काम प्रगतिपथावर असल्याचे शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितले. यावर १ एप्रिल २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची डेडलाईनच पालकमंत्र्यांनी घालून दिली.आता १३ ऑक्टोबरला बैठकशुक्रवारच्या बैठकीत जे जे विषय झाले त्या विषयांवर महापालिकेने मिशन मोडवर येऊन कार्यवाही करण्याचे आदेश देत पालकमंत्र्यांनी यासंदर्भातील पुढील आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ऑक्टोबरला बैठक घेऊन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Engineers suspended in fire station collapse case, minister orders.

Web Summary : Following a fire station roof collapse, Kolhapur's minister ordered suspension of negligent engineers. Road construction quality will be investigated. Open space encroachment is a concern. Keshavrao theater renovations get deadline.