शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सराफ संघाचा विकास हाच अजेंडा

By admin | Updated: October 8, 2014 00:30 IST

हालचाली निवडणुकीच्या : उमेदवारांची प्रचार यंत्रणा कामाला

कोल्हापूर : कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांची शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या अध्यक्षपदावर दावा केलेल्या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी संघाचा विकास हा आपला अजेंडा सभासदांसमोर ठेवला आहे. निवडणुकीला फक्त एक दिवस बाकी उरल्याने प्रचार यंत्रणेलाही आता वेग आला आहे. अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी की पूर्वानुभवावर विश्वास यावरच आता मतदारांचा कौल ठरणार आहे. कोल्हापूर सराफ संघाची निवडणूक गुरुवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे. अध्यक्षपदासाठी सुरेश गायकवाड आणि संजय खद्रे इच्छुक आहेत. सुरेश गायकवाड यांनी दोनवेळा भूषविलेल्या अध्यक्षपदाच्या आणि कामाच्या जोरावर या पदावर दावा सांगितला आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचे पत्रकच प्रसिद्ध केले असून, आजवर केलेल्या कामांची यादी दिली आहे. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अंगाडियाने माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ स्थापन करणार, अंबाबाईची मूर्ती योग्य ठिकाणी बसविण्याचा प्रयत्न, सभासदांना कायद्यांची माहिती देणे व कोल्हापूरच्या कलाकुसरीच्या दागिन्यांची ओळख देशभरात पोहोचविणे अशी कामे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. संघावर आता नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी मिळायला हवी, अशी एक मानसिकता आहे. संघाचे विद्यमान उपाध्यक्ष असलेले संजय खद्रे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. आपल्या प्रचारात त्यांनी सराफ व्यावसायिकांसाठी कार्यशाळा, दाग-दागिन्यांची प्रदर्शने भरविणे, सराफ व्यावसायिकांचा सर्वांगीण विकास, सभासदांना कायद्यांची माहिती मिळावी हे मुद्दे सभासदांना पटवून देत आहेत. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांनी संघाचा आणि सभासदांचा विकास हाच विषय अजेंड्यावर ठेवला असला, तरी सभासद मतदारांचा कौल गुरुवारी पतपेटीत बंद होणारआहे. (प्रतिनिधी)सराफ संंघाचा आणि कोल्हापूरच्या सराफ बाजाराचा विकास करण्याची संधी आता नव्या चेहऱ्याला देखील मिळाली पाहिजे. संघाचा अध्यक्ष तरुण आणि सुशिक्षित असला, तर नवनवीन संकल्पना राबविता येतील. - संजय खद्रे (इच्छुक उमेदवार)ंमी अध्यक्ष म्हणून आजवर केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा ही निवडणूक लढवित असून, राजस्थानी सभासदांनीच मला यासाठी पांिठंबा दिला आहे. ं- सुरेश गायकवाड(इच्छुक उमेदवार)अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आज सराफ संघाचे एक माजी उपाध्यक्ष सभासदांना अध्यक्ष रणजित परमार यांच्या विरोधात पत्रके वाटत असल्याचे निदर्शनास आले. मी माझ्या अध्यक्षपदाच्या काळात किंवा राजकीय कारकिर्दीत एक रुपयांचाही भ्रष्टाचार केलेला नाही. काही कामधंदा नसलेली माणसं संघावर निवडून येण्यासाठी असले उद्योग करीत आहेत. सभासदांना कोण चांगले, कोण वाईट हे माहीत आहे. त्यामुळे त्यांनी असले धंदे बंद करावेत. माझ्यावर केलेल्या आरोपांविरोधात मी संबंधित व्यक्तीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे परमार यांनी सांगितले.