माजगावात मान्यवरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST2021-06-21T04:17:14+5:302021-06-21T04:17:14+5:30

यवलूज : कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर वैद्यकीय उपचार व मार्गदर्शन केल्याबद्दल माजगाव (ता.पन्हाळा) येथील डॉ.बी.आर. माने, ...

Greetings of dignitaries in Mazgaon | माजगावात मान्यवरांचा सत्कार

माजगावात मान्यवरांचा सत्कार

यवलूज : कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर वैद्यकीय उपचार व मार्गदर्शन केल्याबद्दल माजगाव (ता.पन्हाळा) येथील डॉ.बी.आर. माने, डॉ.अनिल चव्हाण,डॉ. किरण माने व डॉ.सतीश चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. पन्हाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पा.वि.पाटील यांच्या हस्ते हा सत्कार झाला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत डॉ.बी.आर. माने,डॉ.अनिल चव्हाण , डॉ. किरण व डॉ.सतीश यांनी परिसरातील रुग्णांची माफक दरात २४ तास वैद्यकीय सेवा केली व त्यांना मार्गदर्शन केले आहे.माजी सरपंच जीवन पाटील यांनी सुद्धा कोरोना महामारीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला. कृष्णात पाटील यांनी या सत्काराचे नियोजन केले होते.

यावेळी सर्जेराव पाटील, प्रवीण चौगुले, सुरेश पाटील, निवास मगदूम, अंकुश पाटील, बाजीराव पाटील, सचिन पाटील, नवनाथ चौगले, ज्ञानदेव पाटील,,रवींद्र पाटील,विजय पाटील आदी उपस्थित होते.बाजीराव कदम यांनी प्रास्ताविक केले.शरद पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Greetings of dignitaries in Mazgaon