शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या महापुराने आजरा मार्ग चिंब!

By admin | Updated: December 2, 2014 00:21 IST

लाखोंची दारू पकडली : आजऱ्यातही चोरटी विक्री

आजरा : आजरा-आंबोली मार्गावर गोव्याहून चोरट्या मार्गाने येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूसह ठिकठिकाणी विकल्या जाणाऱ्या गावठी दारूने हा मार्ग चिंब झाला असून, बेकायदेशीररीत्या ज्याची वाहतूक होते ते सर्व प्रकार या मार्गावर सुरू असल्याने आता सिंधुदुर्ग, आजरा सीमेवर वाहन तपासणी नाका उभारण्याची गरज आहे.गेल्या आठवड्यात या मार्गावरून वाहतूक होणारी तब्बल ६४ लाख रुपयांची दारू वाहतूक करणारी वाहने उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतली. आजरा पोलिसांनी किणे येथे कारवाईचा बडगा उगारत २० हजारांची गोवा बनावटीची दारू ताब्यात घेतली. अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या दारू विक्री होताना दिसते.मुळातच गोव्याहून आजरामार्गे धावणाऱ्या सर्वच वाहनांची तीन ते चार ठिकाणी तपासणी होते. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे दोन ठिकाणी तपासणी नाके आहेत. एवढी दक्षता घेतली जात असताना दारू वाहतूक करणारी वाहने आजपर्यंत येतातच कशी? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.सण-समारंभाच्या निमित्ताने किरकोळ स्वरूपात दारू या मार्गावरून आणली जात होती; परंतु अलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून दारूची वाहतूक होऊ लागली आहे, ही गंभीर बाब आहे. आजरा पोलीस अचानक रात्री गस्त घालून वाहने तपासण्याचे प्रयोग करीत आहेत; पण आजरा-सिंधुदुर्ग सीमेवर कायमस्वरूपी नाक्याची गरज आहे. (प्रतिनिधी)तरुणाई मद्यविक्रीत महाराष्ट्र बनावटीची व गोवा बनावटीची दारू यांच्या किमतीत मोठा फरक असल्याने गोवा बनावटीच्या दारूला मोठी मागणी आहे. आजऱ्यातून व्यवसायासाठी गोव्याला जाणाऱ्यांकडून राजरोसपणे दारू उपलब्ध होते.‘गोव्या’वरच जत्रा, वराती आजऱ्यासह चंदगड, भुदरगड भागांतील गावोगावच्या जत्रा, यात्रा, वराती व इतर कार्यक्रमही गोवा बनावटीच्या दारूमुळेच आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याचे चित्र आहे.