शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी नगराध्यक्ष, आमदारांमध्ये कलगीतुरा

By admin | Updated: March 9, 2015 01:09 IST

इचलकरंजी नगरपरिषद : महिला आरक्षणाविषयी परस्परविरोधी टिप्पणी

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजित जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आजी-माजी नगराध्यक्ष व आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या भाषणात मारलेल्या टोमण्याने कलगीतुरा रंगला. यावेळी महिला आरक्षणाचे स्वातंत्र्य आणि पालिकेतील बदललेल्या परिस्थितीनुरूप गटनेतेपदातील फरक या मुद्द्यांवर टीकाटिप्पणी झाली. माजी नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांनी महिलांना मुक्तपणे पदाचा वापर करता येत नाही, असा मुद्दा मांडला. त्यानंतर आमदार हाळवणकरांनी गोंदकरांचा मुद्दा खोडून काढत नगराध्यक्ष शुभांगी बिरंजेंसारखे प्रसंगी बंड केले पाहिजे, असे सूचवित चौकार ठोकला. तर नगराध्यक्ष बिरंजे यांनी आमचे गटनेते म्हणून बाळासाहेब कलागते यांचा व विद्यमान गटनेते म्हणून अजित जाधव यांचा उल्लेख करीत षट्कार ठोकला. नगराध्यक्ष बिरंजे या कॉँग्रेसच्या असूनही त्यांनी बंड केले आणि नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. त्यांच्या या बंडाला आमदार हाळवणकर यांच्या शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला. मात्र, नगराध्यक्षांवर अविश्वासदर्शक ठराव आणता येत नाही म्हणून विकासकामांचा दाखला देत कॉँग्रेसने नगराध्यक्ष बिरंजे यांना सहकार्य केले. अशा पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी नगराध्यक्ष बिरंजे यांनी आयोजित केलेली विशेष सभा कॉँग्रेसच्याच नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने गणपूर्तीअभावी रद्द झाली. त्यामुळे नगरपालिकेत सर्व काही आलबेल आहे याबाबत पुन्हा शंका उपस्थित झाली. त्यापाठोपाठ श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पालिका आयोजित महिला महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार हाळवणकर, माजी नगराध्यक्ष गोंदकर व नगराध्यक्ष बिरंजे बोलत होत्या. सुप्रिया गोंदकर यांनी महिलांना विविध स्वायत्त संस्थांच्या पदांसाठी आरक्षण मिळाले; पण पदावरील महिलेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही, असा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना आमदार हाळवणकर यांनी, सध्याच्या नगराध्यक्ष बिरंजे यांनी आपली निर्णय क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. त्यांनी बंडखोरी केली, याचा दाखला दिला. ते पुढे म्हणाले, पदावर असलेली महिला स्वतंत्र विचाराची व धाडसी असेल, तर तिला सर्व काही साध्य होते. (प्रतिनिधी)