शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार- पालकमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 2:10 PM

rain, farmar, satejpatil, minister, kolhapurnews अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार : पालकमंत्री पाटील यांचा इशाराचंदगड तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी, पंचनाम्याचे दिले आदेश

कोवाड : अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पालकमंत्र्यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, कालकुंद्री, हुंदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी कोवाड येथे बैठक घेतली. बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील पिकांचे नुकसान आणि पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.पालकमंत्री म्हणाले, ३० आॅक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा. त्याबाबत शेतकऱ्यांना आदल्यादिवशी निरोप द्या, गावांमध्ये दवंडी द्या. भरपाई देण्यासाठी शासन पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सहकार्य करावे.यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, संभाजी देसाई, अशोकराव देसाई, दुंडगे सरपंच राजेंद्र पाटील, कल्लाप्पा भोगण, अरुण सुतार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोदरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम आदी उपस्थित होते.पडलेला ऊस आधी गाळाशेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही संबंधित कारखान्याना पाठवावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

शेतकरी महिलेशी संवादभाताचे नुकसान झालेल्या कर्यात भागातील रुक्मिणी गोविंद गिरी या शेतकरी महिलेशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या दुसऱ्याचे शेत कसायला घेतले होते. पावसामुळे संबंध पीक वाया गेले. काळजी करु नका, सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा पालकमंत्र्यांनी त्यांना दिला.

पुलाबाबत लवकरच बैठकदुंडगे आणि कुदनूरला जोडणाऱ्या धोकादायक पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. संरक्षित कठडा नसल्याने झालेल्या दुर्घटनांची माहिती आमदार पाटील यांनी दिली. पुलासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलministerमंत्रीkolhapurकोल्हापूर