शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

गावातील दारू धंदे रोखणार ‘ग्रामरक्षक दल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागात अगर पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामीण भागात अगर पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्रामरक्षक दला’ची स्थापना करण्यात येणार आहे. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने हा नवा उपक्रम हाती घेण्यात येत असून त्यासाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाऊल उचलले आहे. ग्रामीण पातळीवर गावठी हातभट्टी दारूचे अड्डे काही नेत्यांचा अश्रयाने सुरू असल्याचे आढळले आहे. त्याला चाप बसविण्याचा प्रयत्न आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी वाड्या-वस्त्यांमध्ये गावठी दारू बनविण्याच्या हातभट्ट्या राजरोसपणे पेटलेल्या आहेत. त्या रोखणे पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे आवाक्याबाहेर आहे. या हातभट्ट्या जेसीबी मशीनद्वारे पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या तरीही पुढील दोन-तीन दिवसांत पुन्हा याच गावठी दारूच्या हातभट्ट्या पुन्हा पेटलेल्या असतात. त्यामुळे कितीही कारवाई केली तरीही पुन्हा या हातभट्ट्या गाळण्याचा व्यवसाय सुरूच असतो. त्या दारू धंदेवाल्यांची परिसरात दहशत प्रचंड असते. त्यामुळे त्यांच्याविरोेधात सर्वसामान्य तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.

जिल्ह्यातील अपुरे पोलीस संख्याबळ पाहता हातभट्ट्यावर वारंवार जाऊन कारवाई करणे पोलीस दलास शक्य नाही. या दारू धंदेवाल्यांना चाप बसविण्यासाठी पोलीस दलातर्फे जिल्ह्यात प्रत्येक गावस्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येत आहे. २०१७ मध्ये शासनाने कायदा करून अशा पद्धतीने ग्रामरक्षक समितींना अधिकार दिले आहेत. त्याचा आधार घेत आता गावपातळीवर चांगली वर्तणूक असणाऱ्या आठ-दहा लाेकांची समिती करून त्या समितीद्वारे हातभट्टी अगर अवैद्य दारू व्यवसायाला आळा घालण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न आहे. पोलीस दलाच्या वतीने पुढील तीन महिन्यांचा कारवाईचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

चोवीस तासांत कारवाई

गाव पातळीवर नेमल्या जाणाऱ्या ‘ग्रामरक्षक दल’च्या समितीने पोलीस ठाण्याकडे संबंधित हातभट्टी अगर अवैध दारू व्यावसायिकांविरोधात तक्रारी करायची आहे, अगर त्यांनी माहिती कळवायची आहे. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत हद्दीतील पोलीस ठाण्यामार्फत तेथे छापा टाकून कारवाई करण्यात येणार आहे.

कोट...

पोलीस कर्मचारी संख्या अपुरी असल्याने वारंवार हातभट्ट्या उद्ध्वस्त करताना अगर कारवाई करताना मर्यादा येतात. त्यामुळे गावपातळीवरच ग्रामरक्षक दल स्थापन करून त्यांना काही प्रमाणात कारवाईचे अधिकार देण्यात येतील. त्याबाबतचा नियोजित आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा