शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत इमारत धोकादायक

By admin | Updated: December 5, 2014 23:38 IST

कुंभोज ग्रामपंचायत : ग्राम सचिवालय उभारण्यात अडथळा

कुंभोज : येथील ग्रामपंचायत कार्यालयाची ३७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आर.सी.सी. इमारत धोकादायक बनल्याने पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, तसेच कर्मचारी जीव मुठीत घेऊन दैनंदिन कामकाज करीत आहेत. कार्यालयाची जागाच ग्रामपंचायतीच्या नावावर नसल्याने नवी ग्राम सचिवालयाची इमारत उभारण्याचे ग्रामपंचायतीचे आजवर केवळ स्वप्नच बनून राहिले आहे. याकामी ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या पाठपुराव्यास अद्यापही यश मिळालेले नाही.सुमारे १५ हजार लोकसंख्या असणाऱ्या कुंभोज गावच्या ग्रामपंचायतीची कार्यालय इमारत १९७७ साली बांधण्यात आली. सध्या या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालयाशिवाय तलाठी कार्यालय, तसेच नगर भूमापन कार्यालयाचा संसार चालला आहे. तथापि, सर्वच कार्यालयांचे अपुऱ्या जागेत कामकाज सुरू असताना या इमारतीच्या बहुतांश छताच्या खालील बाजूच्या स्लॅबचे ढपले पडून सळई उघड्या पडल्या आहेत. ग्रामपंचायतीसमोरील छत (पोर्च) केव्हाही कोसळेल, अशा अवस्थेत आहे. परिणामी, प्रामुख्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज जीव मुठीत धरून सुरू आहे. या जागी ग्रामसचिवालय इमारत उभारण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली जागा जिल्हा परिषद अर्थात ग्रामपंचायतीच्या नावावर न झाल्याने या इमारतीच्या निर्लेखनास बांधकाम खाते परवानगी देण्यास तयार नाही. जागा नावावर होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा सुरू केला असला, तरी अद्याप हे काम तहसील व भूमापन कार्यालय या दोन्हींत चेंडू बनून रेंगाळल्याचे समजते. या कामी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नास स्थानिक आमदार, खासदार यांचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे.ग्राम सचिवालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकतेच सहकार, तसेच बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले असून, याकामी खा. राजू शेट्टी व आमदार सुजित मिणचेकर यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे. - माधवी नंदकुमार माळी, सरपंच, कुंभोज.

ग्रामपंचायत इमारत धोकादायक