धान्य व्यापारी पद्माकर बावडेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:27 IST2021-03-09T04:27:09+5:302021-03-09T04:27:09+5:30

कोल्हापूर : येथील महापालिकेजवळील धान्याचे प्रसिद्ध व्यापारी पद्माकर वसंतराव बावडेकर-शेटे (७१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन ...

Grain trader Padmakar Bawdekar passes away | धान्य व्यापारी पद्माकर बावडेकर यांचे निधन

धान्य व्यापारी पद्माकर बावडेकर यांचे निधन

कोल्हापूर : येथील महापालिकेजवळील धान्याचे प्रसिद्ध व्यापारी पद्माकर वसंतराव बावडेकर-शेटे (७१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. खणविहार मित्र मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. नियमित पोहणे, आनंदी व मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते.

गोपाळ कुलकर्णी कोल्हापूर : देवकर पानंद परिसरातील दीप सरोवर काॅलनीतील गोपाळ नरहर कुलकर्णी (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

नीता पाटील

कोल्हापूर : रंकाळा परिसर काॅलनी, सुतारमाळ येथील नीता दिलीप पाटील (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्या सहायक पोलीस आयुक्त सुरेश पाटील यांच्या वहिनी होत.

करीम मुजावर

कोल्हापूर : फुलेवाडीतील निवृत्त मनपा मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष करीम हनिफ मुजावर (८३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिगर शेती विभागाचे उपमहाव्यवस्थापक अल्ताफ मुजावर यांचे वडील होत.

Web Title: Grain trader Padmakar Bawdekar passes away