शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सायझिंग उद्योगाच्या ‘व्हॅट’ रद्दसाठी शासन सकारात्मक

By admin | Updated: October 19, 2015 23:55 IST

लवकरच निर्णय : अर्थमंत्र्यांची ‘सायझिंग’च्या शिष्टमंडळाला ग्वाही

इचलकरंजी : सायझिंग उद्योगाला लागू केलेला मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द होण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक असून, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील सायझिंग असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.शासनाच्या विक्रीकर खात्याकडून सायझिंग उद्योगाला वर्क्स काँट्रॅक्ट टॅक्स लागू करण्याच्या नोटिसा सुमारे पंधरा वर्षांपूर्वी देण्यात आल्या होत्या. त्याबाबत तत्कालीन शासनाकडे येथील सायझिंग असोसिएशनने प्रयत्न केले होते. तेव्हाचे वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाने तो माफ झाला होता. मात्र, हा कर कायमस्वरूपी रद्द होण्याविषयी प्रयत्न असोसिएशनकडून करण्यात येत होते. त्यानंतर सन २०११-१२ मध्ये काही सायझिंग उद्योगांना त्यांनी व्हॅट आॅडिट करून घेतले नाही म्हणून दंड लावण्यात आला, तर काही सायझिंग उद्योगांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.या करातून कायमस्वरूपी सुटका मिळावी म्हणून सायझिंग असोसिएशनच्यावतीने शासनाकडे वारंवार प्रयत्न केले जात होते. मात्र, त्याला यश आले नाही. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नाने सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या मंत्रालयातील दालनात सायझिंग असोसिएशनच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली. यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार, अर्थ सचिव श्रीनिवास, विक्रीकर आयुक्त राजू जलोटा, आमदार हाळवणकर, सायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष जयंत मराठे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणारया बैठकीमध्ये सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी व्हॅट रद्द करण्याविषयी शासनाची भूमिका सकारात्मक आहे. मात्र, हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन तो रद्द करावा लागेल. त्यासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार व आमदार हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला.