शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठीच अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST

कोल्हापूर : अर्थसंकल्पामध्ये जीएसटीत नव्याने केलेले बदल व्यापाऱ्यांसाठी जाचक आहेत. कोरोनामध्ये अगोदरच अडचणीत असणारे व्यापारी भरडले जाणार आहेत. ...

कोल्हापूर : अर्थसंकल्पामध्ये जीएसटीत नव्याने केलेले बदल व्यापाऱ्यांसाठी जाचक आहेत. कोरोनामध्ये अगोदरच अडचणीत असणारे व्यापारी भरडले जाणार आहेत. मोदी सरकारमध्ये सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठीच केवळ अच्छे दिन आल्याची घणाघाती टीका कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी येथे केली.

कॅटने जीएसटीतील बदलाच्या विरोधात शुक्रवारी ( दि.२६) ‘भारत व्यापार बंद’ व ‘देशव्यापी चक्का जाम’ची घोषणा केली. याबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापूर चेंबरच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलेत होते. सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला.

पाटील म्हणाले, जीएसटीमध्ये आतापर्यंत ९०० वेळा बदल झाले, त्यामध्ये व्यापाऱ्यांचे हित जोपासले गेले नाही. या उलट जाचक अटींमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने कायदा करावा; पण माणसाने जगायचेच नाही, असा नको.

कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन बंद यशस्वी करा, असे आवाहन केले. चेंबर्सचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडीया, संचालक अजित कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. चार्टर्ड अकौंटंट दीपेश गुंदेशा यांनी जीएसटीमधील बदलाची माहिती दिली. सूत्रसंचालन सचिव जयेश ओसवाल यांनी केले. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, धनंजय दुग्गे, संचालक भरत ओसवाल, राजू पाटील, वैभव सावर्डेकर, विज्ञानंद मुंढे, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे उपस्थित होते.

चौकट

पुन्हा इन्स्पेक्टरराज

व्यापारी, उद्योजकांना चोर समजून नवीन बदल केले आहेत. जीएसटी निरीक्षकांना दुकानावर धाड टाकणे, बँक खाती सील करण्याचे अधिकार दिल्याने पुन्हा ‘इन्स्पेक्टरराज’ सुरू होणार असल्याचा आरोप धैर्यशील पाटील यांनी केला.

चौकट

ट्रक वाहतूकदारही रस्त्यावर

आंदोलनामध्ये राज्यातील ८ कोटी व्यापारी आणि साडेतीन कोटी ट्रक वाहतूकदार सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता ४० हजार व्यापारी सहभागी होतील. प्रशासनाच्या परवानगी दिली, तर सकाळी ९.३० वाजता रॅलीकडून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले जाणार आहे.

फोटो : २००२२०२१ कोल चेंबर्स ऑफ कॉमर्स न्यूज

ओळी : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शनिवारी झालेल्या बैठकीत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी बंदमागील भूमिका मांडली. यावेळी संजय शेटे, संजय पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल आदी उपस्थित होते.