शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा सुवर्ण ‘पंच’कार

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

राज्यस्तरीय महिला कुस्ती : स्वाती, नंदिनी, प्रियंका, माधुरीसह रेश्माचे सोनेरी यश

अहमदनगर : राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी मैदान गाजवित पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदके मिळवून कुस्तीतील दबदबा कायम ठेवला़ पुणेकरांनी दोन सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदके मिळवून स्पर्धेत दुसरे स्थान मिळविले़ सोलापूरला एक सुवर्ण व तीन रौप्य पदकावर समाधान मानावे लागले़ यजमान नगरला या स्पर्धेत एकही पदक मिळविता आले नाही़ या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील महिला कुस्तीगीरांनी चमकदार कामगिरी करत मैदानातील आपली हुकूमत सिद्ध केली जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि़ १९) आठ वजन गटातील अंतिम लढती रंगल्या़ प्रत्येक वजन गटातील अंतिम लढती लक्षवेधी ठरल्या़ मैदानात रणरागिनींचे रंगलेले हे मल्लयुद्ध पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती़ आमदार शिवाजी कर्डिले व स्वागताध्यक्षा सुवर्णा कोतकर, आयोजक अंजली देवकर-वल्लाकट्टी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली़ स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : ४८ किलो - स्वाती शिंदे (कोल्हापूर जिल्हा) सुवर्ण, पूजा दमाहे (गोंदिया), रौप्य, तर प्राजक्ता पाटील (सांगली) कांस्यपदक़ ५३ किलो - नंदिनी साळोखे (कोल्हापूर जिल्हा) सुवर्ण, कोमल जाधव (पुणे जिल्हा) रौप्य, पूजा आंग्रे (भंडारा) कांस्यपदक.५५ किलो - प्रियंका येरुडकर (कोल्हापूर जिल्हा) सुवर्ण , तेजस्विनी मेंडके (कोल्हापूर शहर) रौप्य, सोनाली तोडकर (बीड) कांस्य.५८ किलो - माधुरी घराळ (कोल्हापूर जिल्हा) सुवर्ण, कोमल गोळे (पुणे शहर) रौप्य, हेमलता घोडके (पुणे जिल्हा) कांस्यपदक६० किलो - अंकिता गुंड (पुणे जिल्हा) सुवर्ण, शोभा भोसले (सोलापूर) रौप्य, आश्विनी मढवी (ठोण जिल्हा) कांस्य पदक ६३ किलो - उषा माने (सोलापूर) सुवर्ण, राधा कुटे (नाशिक) रौप्य, अस्मिता गवस (रायगड) कांस्यपदक ६९ किलो - मनीषा दिवेकर (पुणे जिल्हा) सुवर्ण, गीता चौधरी (भंडारा) रौप्य, समृध्दी पवार (रायगड) कांस्य ७५ किलो - रेश्मा माने (कोल्हापूर जिल्हा) सुवर्ण, तेजश्री दहिळकर (अमरावती) रौप्य, राजश्री कांबळे (सोलापूर) कांस्यपदक. (प्रतिनिधी)पदक तालिकाप्रथम क्रमांक कोल्हापूर :पाच सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्यद्वितीय क्रमांक पुणे -दोन सुवर्ण, दोन रौप्य, तीन कांस्य तृतीय क्रमांक सोलापूर- एक सुवर्ण, तीन रौप्यरेश्माची तेजस्विनीला ढाक ६०, ६३, ६९ व ७५ किलो वजनगटातील अंतिम लढती लक्षवेधी ठरल्या़ ७५ किलो वजन गटातील रेश्मा माने (कोल्हापूर) व तेजस्विनी दहिळकर यांच्यातील लढतीत रेश्मा हिने ढाक मारून तेजस्विनीला चितपट करीत सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली़ विजेत्या स्पर्धकांना आ़ शिवाजी कर्डिले, स्वागताध्यक्षा, उपमहापौर सुवर्णा कोतकर, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली़