Kolhapur: ‘गोकुळ’ निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार, 'मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:15 IST2026-03-07T18:14:58+5:302026-03-07T18:15:37+5:30

खासदार धनंजय महाडिक यांची घोषणा

Gokul election will be contested by the BJP led Mahayuti, Exclude Mushrif from the panel | Kolhapur: ‘गोकुळ’ निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार, 'मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करा'

Kolhapur: ‘गोकुळ’ निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार, 'मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करा'

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुती म्हणून एकत्र लढवली जाईल अशी घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली. भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडे जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समरजित घाटगे, अंबरीष घाटगे, दिलीप पाटील, स्वाती कोरी, संजय पाटील, उमेश आपटे, नाथाजी पाटील, रवीश पाटील-कौलवकर, आनंद गुरव, भिकाजी जाधव, प्रवीणसिंह पाटील, अशोक चराटी उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान अजिबात वाटत नाही. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे, गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीलाच कौल मिळेल. ‘गोकुळ’च्या निवडणुकीला जिल्ह्यातील किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वांनी तयारी करावी.

शौमिका महाडिक म्हणाल्या, गेल्या निवडणुकीत गोकुळमधील सत्तेची संधी थोडक्यात हुकली. त्यावेळी झालेल्या चुका सुधारून आता या निवडणुकीला सामोरे जाऊया. गेल्या पाच वर्षांत दूध संस्थांसाठी, दूध उत्पादकांसाठी अनेकवेळा संघर्षाची भूमिका घ्यावी लागली. त्याचा त्रास आमच्या संस्थांनाही झाला. परंतु, आता महायुतीचे अध्यक्ष असल्याने आम्ही सहकार्याची भूमिका घेतली आहे. आता महायुतीची सत्ता गोकुळमध्ये येईल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वच बाबतीत अच्छे दिन येतील.

मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करा

किती दिवस हसन मुश्रीफ यांचे ओझे आपल्यावर घेणार असा प्रश्न उपस्थित करत भाजपने स्वतंत्र पॅनेल करावे अशी मागणी जयवंत सुतार, आजरा आणि मार्तंड जरळी गडहिंग्लज यांनी यावेळी केली. परंतु, त्यानंतरही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा परिषदेबाबत फडणवीस करणार घोषणा

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांबाबत येत्या चार दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतील अशी माहितीही खासदार महाडिक यांनी दिली.

Web Title : भाजपा के नेतृत्व में महायुति गोकुल चुनाव लड़ेगी, मुश्रीफ बाहर।

Web Summary : भाजपा के नेतृत्व में महायुति गोकुल दूध संघ का चुनाव लड़ेगी। पैनल से हसन मुश्रीफ को बाहर करने की मांग उठी। देवेंद्र फडणवीस जल्द ही जिला परिषद के फैसलों की घोषणा करेंगे।

Web Title : Mahayuti to contest Gokul election under BJP, exclude Mushrif.

Web Summary : Mahayuti will contest the Gokul milk union election under BJP leadership. Calls to exclude Hasan Mushrif from the panel were made. Devendra Fadnavis will announce Zilla Parishad decisions soon.