Gokul Election Result : गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक गटाला धक्का, वीरेंद्र मंडलिक पराभूत, विरोधी गटाचे १७, तर सत्ताधारी गटाचे ४ उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 22:37 IST2021-05-04T22:31:27+5:302021-05-04T22:37:37+5:30
Gokul Election Result: मागच्या कित्येक वर्षांपासून गोकुळमध्ये महाडिक गटाची सत्ता होती. सत्तांतरण करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली आहे. गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती.

Gokul Election Result : गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक गटाला धक्का, वीरेंद्र मंडलिक पराभूत, विरोधी गटाचे १७, तर सत्ताधारी गटाचे ४ उमेदवार विजयी
कोल्हापूर - खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा विरेंद्र मंडलिक व राजेश पाटील यांची पत्नी आणि वीरेंद्र मंडलिक यांची आत्या यांना गोकुळमध्ये पराभवाला सामोरे जावं लागले आहे. दरम्यान विरोधी गटाचे १७ उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी गटाते ४ उमेदवार निवडुन आले.
मागच्या कित्येक वर्षांपासून महाडिक गटाची सत्ता होती. सत्तांतरण करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली आहे. गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती.
गोकुळला मल्टिस्टेट करण्यावरून मागच्या दोन वर्षांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच लढाई सुरू होती. विरोधी गटाचे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा चंग बांधला होता. यावरून जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली होती. याचाच फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचे दिसून आले.