Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:33 IST2025-06-26T18:31:16+5:302025-06-26T18:33:51+5:30

'ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने मला फारसे काही बाेलायचे नाही'

God protected my cows, Minister Hasan Mushrif reacted after the petition was disposed of due to the filing of the C Summary Report in the Ghorpade factory case | Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया

Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : असे म्हणतात की आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखतो, माझ्या गायी परमेश्वराने राखल्या अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यातील फसवणुकीच्या आरोपप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंबंधी ते बोलत होते. ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने मला फारसे काही बाेलायचे नाही, असे म्हणत त्यांनी हात जोडले.

वाचा - मंत्री हसन मुश्रीफांना दिलासा, घोरपडे कारखानाप्रकरणी सी समरी रिपोर्ट दाखल झाल्याने याचिका निकाली

शाहू जन्मस्थळ येथे राजर्षी शाहू जयंतीनिमित्त झालेल्या अभिवादनानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, परमेश्वर महान आहे. आणि गोरगरिबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळेच शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि पंढरीच्या पांडुरंगाची वारी सुरू असताना मला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.

वाचा - मुश्रीफांना दिलासा नाही, न्यायालयाच्या निकालाबाबत समरजीत घाटगे यांनी दिली माहिती

Web Title: God protected my cows, Minister Hasan Mushrif reacted after the petition was disposed of due to the filing of the C Summary Report in the Ghorpade factory case