शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी बँकेत जावा; मिळत आहे विशेष कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 9:48 AM

कोल्हापुरातील अग्रणी बँक असणा-या बँक आॅफ इंडियाने आर्थिक संकटात असणाºयासाठी ‘कोविड १९ पर्सनल लोन’ या नावाने अनोखी कर्ज योजना सुरू केली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देपगार जमा होणाऱ्या खातेदारांसाठी बँक आॅफ इंडियाचे कमी व्याजदरात कर्जकोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्यांच्या मदतीला बँका सरसावल्या‘कोविड १९’ पर्सनल लोन योजना

कोल्हापूर : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्यांच्या मदतीला बँका सरसावल्या आहेत. बँकेत पगार जमा होणाºया कायम कर्मचाऱ्यांसाठी बँक आॅफ इंडियाच्या वतीने ‘कोविड १९ पर्सनल लोन योजना’ आणली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले असून, विशेष म्हणजे जूननंतर हप्ता सुरू होणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी केली आहे. घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांसमोर आर्थिक संकट उभारले आहे. शासकीय कर्मचाºयांच्या पगारातही कपात केली आहे; तर काही संस्थांमध्ये निम्मे पगार दिले जात आहेत. यामुळे अडचणींत भर पडली आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संघटना, संस्था पुढे आल्या आहेत. यामध्ये बँकांनीही पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरातील अग्रणी बँक असणा-या बँक आॅफ इंडियाने आर्थिक संकटात असणाºयासाठी ‘कोविड १९ पर्सनल लोन’ या नावाने अनोखी कर्ज योजना सुरू केली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे. 

कोरोनाच्या संकटात नफ्याचा विचार न करता सामाजिक बांधीलकी म्हणून ‘कोविड १९ पर्सनल लोन’ सुरू केले आहे. लक्ष्मीपुरी शाखेत सहा हजार कर्मचाºयांचे पगार जमा होतात. यामध्ये कायम कर्मचाºयांसाठी योजना लागू आहे. खात्यावर किमान एक वर्ष पगार जमा होणे आवश्यक आहे.व्ही. एम. भातकांडे, मुख्य प्रबंधक, बँक आॅफ इंडिया, लक्ष्मीपुरी शाखा

 

पगार जमा होणाºया खातेदारांसोबत बँकेत हाउसिंग कर्ज घेतलेले तसेच व्यावसायिकांनाही अशा प्रकारचे कर्ज मिळू शकते. त्यांनी आवश्यक कागदपत्रांसोबत आयटी रिटर्न द्यावे लागणार आहे.- प्रतिभा जाधव, मुख्य व्यवस्थापक, कर्ज विभाग, लक्ष्मीपुरी शाखा 

  • -कर्जाचा व्याजदर - केवळ ७.२५ टक्के

-कर्ज रक्कम - पगाराच्या तीनपट-हप्ता सुरू - ३० जूननंतर-------------------------------------

  • कर्जास पात्र- बँक आॅफ इंडियामध्ये पगार जमा होणारे खातेदार

कर्जमागणीसाठी आलेले अर्ज- ५0वाटप कर्ज- ३0 खातेदारांनाकर्जाची सोय- कोल्हापूर, सांगली, सातारा येथील बँक आॅफ इंडियाच्या ११० शाखांत.आवश्यक कागदपत्र- गेल्या तीन महिन्यांतील पगारपत्रक- आधार कार्ड- पॅनकार्ड- फोटो-२- १६ नंबर फॉर्म, आयकर विवरण पत्रकमी व्याजदरात यांना मिळणार कर्ज- केएमटी कर्मचारी- पोलीस प्रशासनातील कर्मचारी- जिल्हा परिषद- जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी- तहसील कार्यालय-इतर बँकांनाही योजना सुरू करण्याची गरजकोल्हापुरातील सर्वच पगारदारांची खाती बँक आॅफ इंडियामध्ये नाहीत. अशा संकटसमयी इतर बँकांनीही अशा प्रकारची पर्सनल कर्ज योजना सुरू करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBank of Indiaबँक ऑफ इंडियाMONEYपैसा