शिरोलीत केमिस्ट योध्द्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:59+5:302021-09-24T04:27:59+5:30

यावेळी पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या महामारीत केमिस्ट बांधवांनी जिवाची बाजी लावून रुग्णांना आणि रुग्णालयांना औषध पुरवठा केला ...

The glory of the chemist warriors in Shiroli | शिरोलीत केमिस्ट योध्द्यांचा गौरव

शिरोलीत केमिस्ट योध्द्यांचा गौरव

यावेळी पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या महामारीत केमिस्ट बांधवांनी जिवाची बाजी लावून रुग्णांना आणि रुग्णालयांना औषध पुरवठा केला आहे. त्यांनी केलेले हे कार्य अभिमानास्पद आहे.

यावेळी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शिरोली, नागाव केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद खवरे, शिरोली ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश यादव, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, जोतिराम पोर्लेकर, अविनाश हाळे, बाजीराव पाटील, हर्षल मणियार, शांतिनाथ पाटील, संग्राम शेळके, सागर नर्मदे, अभिषेक मोहिते, संदीप पाटील उपस्थित होते.

फोटो: २३ शिरोली सत्कार

शिरोलीत कोरोना योध्द्यांच्या सत्कारप्रसंगी राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव मदन पाटील यांचे प्रल्हाद खवरे यांनी स्वागत केले. यावेळी सुरेश यादव, हर्षल मणियार, अनिल खवरे, संदीप, जोतिराम पोर्लेकर उपस्थित होते.

Web Title: The glory of the chemist warriors in Shiroli