शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

किरवलेंच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत द्या

By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST

सी. एल. थूल : घरी भेट देउन घेतली माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्र्ती सी. एल. थूल यांनी आज ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेबाबत माहिती घेऊन त्यांना दिलासाही दिला. न्यायमूर्र्ती थूल यांनी डॉ. किरवले यांच्या पत्नी कल्पना किरवले आणि कन्या अनघा किरवले यांचे सांत्वन केले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करून देय असणारी मदत डॉ. किरवले कुटुंबीयांना तत्काळ देण्याची सूचना न्या. थूल यांनी केली. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे न्या. थूल यांनी डॉ. किरवले हत्येप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासमवेत बैठक घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती तसेच पोलिस तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी डॉ. किरवले यांचे बंधू विष्णू किरवले तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हमाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९) नागरी हक्क संरक्षण व अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत घडलेल्या गुन्ह्णांचा आढावा जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता यांचे प्रतिनिधी अ‍ॅड. उदयसिंह जगताप, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, पोलिस निरीक्षक एस. एस. वाघमारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पासाहेब पालखे, नंदकुमार माने, अशासकीय सदस्य निरंजन कदम, राजू मालेकर, सहायक समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.२३ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार अत्याचाराच्या बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती, जमातींच्या व्यक्तींची हत्या किंवा मृत्यू झाल्यास ८ लाख २५ हजार रुपये त्यांच्या वारसांना अर्थसाहाय्य देय ठरते. त्यानुसार शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ५० टक्के रक्कम तत्काळ मंजूर होते. या शासन निर्णयानुसार डॉ. किरवले यांच्या वारसांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. याबरोबरच जीवनज्योती विमा, जीवनसुरक्षा विमा याअंतर्गत खाते उघडले असल्यास ती रक्कमही तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले; तर सनी पोवार (पेठवडगाव, ता. हातकणंगले) या मृताच्या वारसांनाही उर्वरित २५ टक्के अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. या बैठकीत सात प्रकरणांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले.चार लाखांचे अर्थसाहाय्य डॉ. किरवले हे अनुसूचित जातीतील असल्याने अ‍ॅट्रॉसिटीची कलमे लावून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याची संवेदनशीलता पाहता या प्रकरणात तत्काळ मदत देणे आवश्यक असल्याने मंगळवारी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या वारसांना चार लाख १२ हजार ५०० रुपयाचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले.