शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘मातीचे हेल्थ कार्ड’ देणार

By admin | Updated: December 28, 2016 01:06 IST

राधामोहन सिंह : सिद्धगिरी मठावर किसान समृद्धी शिबिर

कोल्हापूर : आपण शेतीला जमिनीचा तुकडा नाही, तर आई मानतो. या आईरूपी शेतीचे आरोग्य तंदुरुस्त असेल, तरच तिचा मुलगा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणार आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना येत्या वर्षात मातीचे हेल्थ कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी येथे दिली.कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठ येथे आयोजित केलेल्या किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप गोवंश विकास, पंचायत राजचे राष्ट्रीय संघटक हृदयनाथ सिंह होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, खासदार कुुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल, भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयपाल सिंह तोमर, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री अण्णा डांगे प्रमुख उपस्थित होते. कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणाले, ‘शाश्वत शेतीसाठी माती तपासणीसह तिचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सरकार कार्यरत आहे. याअंतर्गत आगामी वर्षात देशातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचे नमुने घेऊन त्यांना माती हेल्थ कार्ड दिले जाईल. आतापर्यंत सुमारे दीड लाख माती नमुन्यांची तपासणी करून अश्ी कार्डे दिली आहेत. मार्च अखेरपर्यंत दोन कोटी २९ लाख जणांना अशी कार्डे दिली जातील. देशात शाश्वत, जैविक, सेंद्रिय, परंपरागत आणि गो-पालन आधारित शेती करण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. यासाठी ५९७ कोटी खर्चाचे ‘उन्नत भारत अभियान’ सरकारने हाती घेतले आहे. ५० एकरांचा एक क्लस्टर असे दहा हजार क्लस्टर बनविण्याची योजना आहे. आतापर्यंत देशात ९११८ क्लस्टरचे काम झाले आहे. कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले. गोपालजी यांनी सूत्रसंचालन केले. आमदार अमल महाडिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘लखपती शेती’देशभर राबविणारसिद्धगिरी मठाने साकारलेला ‘लखपती शेती’ हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा आहे. केंद्र सरकारतर्फे पहिल्या टप्प्यात हा उपक्रम देशातील १०० गावांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, शेतीमधून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. शिवाय शेतीची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, वृक्षारोपण, देशी गार्इंचे संवर्धन व दूधवृद्धीसाठी गोकुळ मिशन व गोकुळ ग्राम, सेंद्रीय शेती प्रमाणीकरण, आदी उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. दरम्यान, मंत्री राधामोहन सिंग यांनी सिद्धगिरी मठाच्या लखपती शेती प्रकल्प, सौरशक्ती निर्जलीकरण कुटी व प्राकृतिक शीतकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात देशभरातील सुमारे २५० शेतकरी सहभागी झाले होते. त्यांना या शिबिरात सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.