शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी शक्य ती कामे पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

कोल्हापूर : पावसाळ्यापूर्वी जोपर्यंत थेट पाइपलाइन व अमृत योजनेची कामे काम करता येणे शक्य आहे तोपर्यंत मनुष्यबळ व यंत्रसामग्री ...

कोल्हापूर : पावसाळ्यापूर्वी जोपर्यंत थेट पाइपलाइन व अमृत योजनेची कामे काम करता येणे शक्य आहे तोपर्यंत मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवून जास्तीत जास्त कामे करून घ्या, अशा स्पष्ट सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रशासक बलकवडे यांनी थेट पाइपलाइन योजना, अमृत योजनेअंतर्गत शहर पाणी पुरवठा योजना व मलनिस्सारण योजनांच्या कामाचा आढावा मंगळवारी घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता अजय साळुंखे, जल अभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता भास्कर कुंभार, शाखा अभियंता आर. के. पाटील, संजय नागरगोजे, ठेकेदार दास ऑफशोअरचे प्रतिनिधी सोनवणे व नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी मदने, सल्लागार प्रतिनिधी विजय मोहिते उपस्थित होते.

विद्युत वाहिनी टाकण्याचे काम महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत फिरती करून तातडीने सुरू करा. ब्रेक प्रेशर टॅकचे काम पावसाळ्यात सुरू ठेवा. पाइपलाइनवरील व्हॉल्वची जागा महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत फिरती करून निश्चित करा. सोळांकूर येथील पाइपलाइनचे काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जल अभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे यांनी योजनेतील झालेल्या व प्रलंबित असलेल्या कामाची माहिती दिली. तर ठेकेदार दास ऑफशोअर यांनी अमृत योजनेच्या केलेल्या कामाची माहिती प्रशासकांना दिली. यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ठेकेदाराने कामाची गती वाढविणे आवश्यक असून त्याकरीता मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वाढविण्याच्‍या सूचना दिल्या. पावसाळयामध्ये उंच टाक्यांची कामे, वितरण नलिका टाकणे, रस्ते रिस्टोरेशन करणे ही कामे करा. काम करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून विहीत मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना बलकवडे यांनी दिल्या.