धरण फुटण्याआधी यंत्र देणार धोक्याचा इशारा, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली अत्याधुनिक प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:14 IST2025-10-17T16:13:53+5:302025-10-17T16:14:14+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणफुटीचा धोका ओळखून इशारा देणाऱ्या यंत्रणेविषयी केलेल्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे. या ...

German patent approved for research on dam burst warning system conducted by researchers from Shivaji University Kolhapur | धरण फुटण्याआधी यंत्र देणार धोक्याचा इशारा, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली अत्याधुनिक प्रणाली

धरण फुटण्याआधी यंत्र देणार धोक्याचा इशारा, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली अत्याधुनिक प्रणाली

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणफुटीचा धोका ओळखून इशारा देणाऱ्या यंत्रणेविषयी केलेल्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात धरणभंग आणि पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम तानाजी गिरीगोसावी, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील प्रा. परेश मट्टीकल्ली, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील डॉ. गणेश सुनील न्हिवेकर आणि विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. तुकाराम डोंगळे यांनी या संदर्भातील संशोधन केले. 

या संशोधकांनी ‘ॲन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर दि डिटेक्शन ऑफ डॅम ब्रिचेस, अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टंन्स’ या शीर्षकाने अभिनव संशोधन केले. या अत्याधुनिक प्रणालीद्वारे धरण फुटीचा धोका लवकर ओळखता येतो. त्याद्वारे नागरिकांना तत्काळ इशारा देणे आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरास मदत करणे या बाबी तातडीने करता येऊ शकतात.

प्रकल्प संशोधक शुभम गिरीगोसावी यांनी या मॉडेलचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिक सादर केले असून या अभिनव प्रणालीला विविध तज्ज्ञ संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या संशोधकांचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title : कोल्हापुर विश्वविद्यालय के शोधकर्ताओं ने विकसित किया बांध टूटने की पूर्व चेतावनी प्रणाली

Web Summary : शिवाजी विश्वविद्यालय के शोधकर्ताओं ने बांध टूटने का जल्द पता लगाने और चेतावनी जारी करने के लिए एक प्रणाली विकसित की। जर्मन-पेटेंट तकनीक आपदा प्रबंधन में मदद करती है, जिससे समय पर निकासी संभव है। इस प्रणाली को राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर सराहा गया है।

Web Title : Kolhapur University Researchers Develop Dam Breach Early Warning System

Web Summary : Shivaji University researchers developed a system to detect dam breaches early and issue warnings. The German-patented technology aids disaster management, enabling timely evacuations. This innovative system has received national and international accolades for its effectiveness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.