शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातच मंडळांची ‘दिवाळी’

By admin | Updated: September 6, 2014 00:41 IST

इच्छुकांकडून हात ढिले : निवडणुकीपूर्वीच कोट्यवधींचे वाटप

राजाराम लोंढे -कोल्हापूर --ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव आल्याने गणेशोत्सव मंडळांची चांगलीच चलती आहे. इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येक मंडळाला हजारापासून पन्नास हजारांपर्यंतची मदत वाटप सुरू आहे. कोल्हापूर शहर, करवीर, कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघांत तर दिवाळीपूर्वीच मंडळांच्या कार्यकर्त्यांची ‘दिवाळी’ सुरू झाली आहे. मतदारसंघांतील मंडळांची संख्या पाहिली तर निवडणुकीच्या आधीच कोट्यवधी रुपयांचे वाटप झाल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत पाण्यासारखा पैसा वाहणार हे निश्चित आहे. सर्वच प्रकारच्या निवडणुका या तरुणांच्या हातात गेल्या आहेत, किंबहुना तरुणांनीच निवडणुका हातात घेतल्याचे चित्र अलीकडील निवडणूक निकालावरून स्पष्ट होते. त्यामुळे तरुण मंडळांचे राजकारणातील महत्त्व वाढले आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मंडळांची पर्यायाने तरुणांची भूमिकाच निर्णायक ठरल्याचे आपण पाहतो. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी तरुण मंडळांच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. गणेशोत्सवाला दरवर्षी राजकीय मंडळी हजेरी लावून मंडळांना मदत करतात. पण यावर्षीच्या गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार असल्याने इच्छुक तरुण मंडळांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार पाहिला तर एका मतदारसंघात लहान-मोठी किमान अडीच हजार मंडळे कार्यरत असतात. या मंडळांना प्रत्येक एक हजारापासून पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत इच्छुकांकडून देण्यास सुरुवात झाली आहे. मंडळांची संख्या आणि मदत पाहिली तर कोट्यवधी रुपये गणेशोत्सव मदतीच्या माध्यमातून वाटप होणार आहे. त्यात ज्या मतदारसंघांत काटा लढत आहे, तेथील मंडळांना भरभरून मदत मिळते. दोन-तीन इच्छुकांकडून पाकीट येऊ लागल्याने मंडळांचे कार्यकर्तेही अचंबित झाले असून विरोधकाचे पाकीट आम्हाला कसे आले? याची चर्चाही कोल्हापूर शहरात जोरात सुरू आहे. डॉल्बी,मंडपाचेही वाटपआर्थिक मदत नको, डॉल्बीसह मंडप, मंदिराची मागणी मंडळांकडून इच्छुकांकडे केली जाते. पंचवीस ते तीस हजार रुपयांचा डॉल्बीचे वाटपही मंडळांना केले जाते तर निवडून आलो की मंदिरासाठी एक लाख रुपये देण्याची ग्वाहीही इच्छुकांकडून दिल जात आहे. टोकाचा संघर्ष असणाऱ्या करवीर मतदारसंघात सध्या पाकिटाच्या वजनाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जोरात सुरू आहे. येथे एका इच्छुकाने मंडळांना ताकदीप्रमाणे (मंडळाच्या) दोन ते पाच हजार रुपयांची मदत दिल्यानंतर अस्वस्थ झालेल्या विरोधी कार्यकर्त्यांनी,आपले पाकीट जरा हलकं झाल्याची तक्रारी थेट नेत्यांकडे सुरू केल्या आहेत, यावर हा तर ट्रेलर आहे...असे सांगत कार्यकर्त्यांचे समाधान केले जात आहे. सुगी सुरू झाली की बारा बलुतेदारांना चांगले दिवस येतात. त्याप्रमाणे निवडणुका जवळ येऊ लागल्या की मंडळाच्या सुगीच्या दिवसाला सुरुवात होते. त्यामुळे मंडळाच्या संख्येतही वाढ होते. विशेषत: ग्रामीण भागात हा प्रकार जास्त पाहावयास मिळतो.