लाटवडेत उत्तराभिमुख महागणपती मंदिरात गणेश जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:43+5:302021-02-16T04:24:43+5:30

खोची : लाटवडे (ता. हातकणंगले) येथील उत्तराभिमुख महागणपती मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात ...

Ganesh Jayanti at the north facing Mahaganapati temple in Latwade | लाटवडेत उत्तराभिमुख महागणपती मंदिरात गणेश जयंती

लाटवडेत उत्तराभिमुख महागणपती मंदिरात गणेश जयंती

खोची : लाटवडे (ता. हातकणंगले) येथील उत्तराभिमुख महागणपती मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी पार्वती हॉलचे उदघाटन मायक्रोटेक सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष वसंत मनवाडकर यांच्याहस्ते, तर नामफलकाचे अनावरण स्वामी देव सेवानंदजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी हिंदुराव पाटील चॅरिटेबल फौंडेशनचे अध्यक्ष शंकर पाटील उपस्थित होते.

त्यानंतर नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. बारा वाजता गणेश जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भजनाचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, फौंडेशनचे उपाध्यक्ष मौक्तिक पाटील, सरपंच संभाजी पवार, उपसरपंच बाळासाहेब भोपळे, बी. आर. पाटील, श्रीकांत पाटील, सुहास शिर्के, सुरेश पाटील, वसंत पाटील, अमर निरुखे, सचिन कोळी, निवास पाटील, उत्तम पाटील आदींसह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यमाचे संयोजन शंकर पाटील ग्रुप व अन्नछत्र कमिटी यांनी केले.

आभार मौक्तिक पाटील यांनी मानले.

फोटो ओळी-लाटवडे येथे उत्तराभिमुख महागणपती मंदिरात गणेश जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया - महेश शिंदे)

Web Title: Ganesh Jayanti at the north facing Mahaganapati temple in Latwade