शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगर-रुकडी पर्यायी मार्ग होणार

By admin | Updated: November 2, 2015 00:34 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचा हिरवा कंदील : गांधीनगर मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

मोहन सातपुते ल्ल उचगाव गांधीनगर (ता. करवीर) येथील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ४ पासून रुकडी असा पर्यायी मार्ग बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या रस्त्याच्या कामाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडमुडशिंगीच्या हद्दीतून रेल्वे मार्गाच्या लाईनच्या पलीकडून हा रस्ता होणार आहे. या पर्यायी रस्त्यामुळे गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा पडणारा ताण कमी होणार आहे. गांधीनगरच्या बाजारपेठेमुळे गुंतागुंतीचा बनलेला मुख्य रस्ता अतिजोखमीचा व वाहनधारकांची डोकेदुखी वाढविणारा असल्याने हा मार्ग झाल्यास गांधीनगरात येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊन रहदारीवर नियंत्रण मिळविता येणार आहे. कोल्हापूरहून इचलकरंजीला जाण्यासाठी कोल्हापूर-सांगली महामार्गाचा वापर होत आहे; मात्र हे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तावडे हॉटेलकडून गांधीनगरमार्गे रुकडी पूल असा प्रस्ताव होता. त्यासाठी रुकडी नदीवर असलेल्या मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली; मात्र हा पूल नव्याने बांधताना गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड कोंडीचा प्रश्न पुढे आला. आता गांधीनगर बाजारपेठेचा विस्तार वाढल्याने गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे. पर्यायी रस्ताच नसल्याने ही कोंडी फोडण्यात अद्यापही यश आले नाही. आता यावर तोडगा काढण्यासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पावले उचलत आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता आणि इचलकरंजीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग (हायवे) ते रुकडी असा नवा रस्ता होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या बांधकाम विभागाला पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी या रस्त्याचा सर्व्हे येत्या दोन महिन्यांत होणार आहे. भूसंपादन प्रक्रियाही गतिमान होणार आहे. पर्यायी रस्ता झाल्याशिवाय गांधीनगरच्या मुख्य रस्त्याची कोंडी फुटणार नाही. त्यामुळे बायपास रस्त्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी आमदार अमल महाडिक प्रयत्नशील आहेत. भूसंपादन आणि सर्व्हेच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. - बी. एस. उगले, उपअभियंता, सा. बां. विभाग, कोल्हापूर.