गांधीनगर स्मशानभूमी रस्ता अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:35+5:302021-09-22T04:26:35+5:30

सध्या गांधीनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनेक समस्या तोंड वर काढत आहेत. कचरा, पिण्याचे पाणी, आणि काही भागात लाईट पोलवरील पथदिवे ...

Gandhinagar cemetery road in darkness | गांधीनगर स्मशानभूमी रस्ता अंधारात

गांधीनगर स्मशानभूमी रस्ता अंधारात

सध्या गांधीनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनेक समस्या तोंड वर काढत आहेत. कचरा, पिण्याचे पाणी, आणि काही भागात लाईट पोलवरील पथदिवे बंद असल्याकारणाने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या समस्या सध्या गांधीनगर व्यापारी पेठला भेडसावत आहेत. गांधीपुतळा, वसाहत रुग्णालय परिसर, म्हसोबा मंदिर, स्मशानभूमीचा रस्ता, या परिसरातील पथदिवे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. रात्री-अपरात्री स्मशानभूमीच्या रस्त्यावरून जाताना चार्जिंग लाईटची व्यवस्था करूनच मृतावर अंतिम संस्कार करण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील लाईटची व्यवस्था तात्काळ करावी, अशी मागणी होत आहे.

कोट : स्मशानभूमी परिसरातील लाईट व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीला कळवले आहे. त्यानुसार लाईट व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

विजय माळी, ग्रामविकास अधिकारी, गांधीनगर

Web Title: Gandhinagar cemetery road in darkness