शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज साखर कारखान्याची ताबापट्टी झालीच नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

गडहिंग्लज : येणी-देणी अंतिम करूनच करारानुसार कारखाना ब्रिस्क कंपनीकडून संचालक मंडळाच्या ताब्यात सुस्थितीत द्यावा, या भूमिकेवर ...

गडहिंग्लज : येणी-देणी अंतिम करूनच

करारानुसार कारखाना ब्रिस्क कंपनीकडून संचालक मंडळाच्या ताब्यात सुस्थितीत द्यावा, या भूमिकेवर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे व माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण हे ठाम राहिल्यामुळे अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची ताबापट्टी बुधवारी होऊ शकली नाही.

२०१३-१४ पासून 'ब्रिस्क कंपनी'ने १० वर्षांसाठी कारखाना सहयोग तत्वावर चालवायला घेतला आहे; परंतु कंपनीने मुदतीपूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी १० एप्रिलपर्यंत कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार कारखान्याच्या हस्तांतरणासाठी नियुक्त समितीचे प्रमुख साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले, प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव, लेखा परीक्षक पी.एम. मोहोळकर व शीतल चोथे हे सकाळी कारखान्याच्या कार्यस्थळी आले होते.

तथापि, कारखान्याचा ताबा घेण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. ऊस बिल, तोडणी वाहतूक बिले, कामगार पगार व इतर देणीबाबत स्पष्टता नसल्याने आणि कंपनीचे जबाबदार पदाधिकारी व निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कारखान्याचा ताबा घेण्यासाठी ८-१० दिवसांची मुदत मिळावी, अशी लेखी मागणी अध्यक्ष शिंदे यांनी यावेळी केली.

दरम्यान, ३१ मार्च २०२१ अखेरची

हंगामी व कायम कर्मचाऱ्यांची थकीत येणी कंपनीकडून मिळावीत, अशी मागणी साखर कामगार संघातर्फे, तर पगारातून कपात केलेल्या रकमेवरील थकीत सुमारे ८० लाखांचे व्याज मिळावे, अशी मागणी गोडसाखर सेवक पतसंस्थेतर्फे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी संचालक बाळासाहेब मोरे, प्रकाश पताडे, सतीश पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी नाईक, बाळकृष्ण परीट, क्रांतीदेवी कुराडे व जयश्री पाटील, साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी शशिकांत चोथे उपस्थित होते.

चौकट

गडहिंग्लज कारखान्याच्या ताबापट्टीच्या मुदतवाढीचा विषय सहकार सचिवांच्या अखत्यारीतील आहे. कारखाना व कंपनी यांच्यातील येणी-देणीबाबत त्यांच्याकडून स्वतंत्र आदेश होणार आहे. आदेशानुसार संचालकांनी कारखान्याचा ताबा घेतला नाही, तर साखर आयुक्त कारखाना आपल्या ताब्यात घेऊ शकतात, असे साखर संचालक डॉ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.