गडहिंग्लज बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:41+5:302021-02-16T04:24:41+5:30

गडहिंग्लज : माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेला ६९ लाख ३६ हजारांचा नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येईल, ...

Gadhinglaj News | गडहिंग्लज बातम्या

गडहिंग्लज बातम्या

गडहिंग्लज : माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेला ६९ लाख ३६ हजारांचा नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येईल, अशी घोषणा अध्यक्ष प्रा. प्रकाश इंगळे यांनी संस्थेच्या ४२ व्या वार्षिक सभेत केली.

चर्चेत जयसिंग पाटील, संजय घोडके, बाळासाहेब मुल्ला, रफिक पटेल, संजय देसाई, विनायक नाईक, बस्तू बारदेस्कर, आशपाक मुरसल यांनी सहभाग घेतला.

यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार झाला. चंद्रशेखर मठपती यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, संचालक सुरेश रेडेकर, अर्जुन कुराडे, पांडुरंग पाटील, मारुती पाथरवट, इनास कुटिन्हो, रामय्या मठपती, संपत सावंत, रवींद्र जांबोटकर, रमेश करगावे, सतीश रेडेकर, बजरंग गरुड, विलास धबाले, मारुती नाईक, वैभव शहा, माधुरी पाटील उपस्थित होते.

सचिव दयानंद दळवी यांनी अहवाल वाचन केले. राजश्री कोले यांनी सूत्रसंचालन केले, तर सयाजी भोसले यांनी आभार मानले.

-------

बातमी -२

गडहिंग्लजमध्ये महिला बचत गटांना प्रशिक्षण

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील महिला बचत गटांना सीमा पाटील व विद्या कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सुनीता नाईक यांनी स्वागत केले. मनीषा पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. गिरिजा कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी साक्षी, मिलन, बालाजी, मैथिली, गणेश, जयभवानी, स्वयंसिद्धा व शिवशक्ती महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

------------

बातमी -३

हिरलगे येथे संयुक्त कार्यक्रम उत्साहात

गडहिंग्लज : हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथे पाणंद रस्ता दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले वाटप, तलाठी, पोलीस पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांच्या दालनाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. तहसीलदार दिनेश पारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास तलाठी चंद्रकांत म्हसवेकर, ग्रामसेवक विक्रम महाजन, पोलीस पाटील दमयंती यादव, बाळासाहेब गुंजाटे, राजाराम शिंदे, प्रवीण देसाई, भीमराव पाटील, सुधाकर देसाई, श्रीधर कुपेकर, सुरेश कुंभार, विष्णू वांगणेकर, जयसिंग देसाई, बाजीराव देसाई, दत्तात्रय देसाई, शंकर गुंजाटे, शंकर वाईंगडे, शिवाजी कुंभार, भाऊ नेसरकर, आनंदा देसाई, राहुल देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार पारगे, माजी सरपंच सचिन देसाई यांनी मार्गदर्शन केले. उदय घाटगे यांनी सूत्रसंचालन केले, तर गोविंद शिंदे यांनी आभार मानले.

-------

Web Title: Gadhinglaj News