शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखाना निवडणुकीतच ‘मुश्रीफ-शिंदे’च्या दोस्तीची कसोटी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

राम मगदूम। लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यातील राजकीय दोस्तीची ...

राम मगदूम।

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यातील राजकीय दोस्तीची कसोटी गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत लागणार आहे. त्यामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष या कारखान्याच्या आगामी निवडणुकीकडे लागले आहे.

अनेक वर्षे एकमेकांचे राजकीय विरोधक राहिलेले हे दोघेही कारखान्याच्या गेल्या निवडणुकीत अनअपेक्षितपणे एकत्र आल्यामुळे जिल्ह्याला धक्का बसला होता. त्यामुळे त्यांची आघाडी यावेळीही कायम राहणार की, कारखान्यातील राजकीय समिकरणे पुन्हा बदलणार? याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

२००१पासून कारखान्यात शिंदे व प्रकाश चव्हाण या जोडगोळीची सत्ता होती. परंतु, २०१३ मध्ये आर्थिक अरिष्टातील कारखाना चालवायला देण्यावरून त्यांच्यात मतभेद झाले. त्यातूनच चव्हाणांनी शिंदेंना अध्यक्ष पदावरून दूर करून मुश्रीफांच्या सहकार्याने कारखाना खासगी कंपनीला चालवायला दिला.

मात्र, असे असतानाही गेल्या निवडणुकीत मुश्रीफांनी चव्हाण व त्यांच्या १५ सहकाऱ्यांना बाजूला ठेवले आणि शिंदेंशी दोस्ती करून कारखान्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. सध्या कारखान्यात ‘मुश्रीफ-शिंदे-नलवडे’ आघाडीचे ११ तर विरोधी शहापूरकर-चव्हाण आघाडीचे ८ संचालक आहेत. येत्या मार्चमध्ये कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आहे.

--------------------------------------------

* गेल्यावेळी कोण-कुणाबरोबर ?

गेल्या निवडणुकीत शिंदे-मुश्रीफ व नलवडे यांच्या आघाडीविरूद्ध शहापूरकर-चव्हाण-हत्तरकी- कुराडे-कुपेकर-अप्पी पाटील गट एकत्र आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तिसरे पॅनेल होते.

--------------------------------------------

* सेवानिवृत्तांचा प्रश्न कळीचा !

कामगार आणि त्यांच्या पत्नी दोघेही सभासद असणारा गडहिंग्लज हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. परंतु, सुमारे ३०० सेवानिवृत्त कामगारांचे फायनल पेमेंट व ग्रॅच्युईटी मिळून सुमारे १७ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

--------------------------------------------

* गेल्यावेळी कारखान्यात एकत्र आलेले शिंदे व मुश्रीफ नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकत्र आले. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत दोघांची भूमिका काय राहणार? यावरच नगरपालिका निवडणुकीची समिकरणे अवलंबून आहेत.

--------------------------------------------

* सध्याचे बलाबल

* सत्ताधारी आघाडी - (शिंदे-मुश्रीफ-नलवडे) ११

* विरोधी आघाडी - (शहापूरकर-चव्हाण-हत्तरकी-कुराडे-अप्पी पाटील गट) ८

--------------------------------------------

* हसन मुश्रीफ : १३०१२०२१-गड-०३

* श्रीपतराव शिंदे : १३०१२०२१-गड-०४