जनवाड येथील जवानावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:11+5:302021-08-22T04:28:11+5:30

निपाणी : जनवाड येथील जवान महेश महादेव घाटगे यांचे चंदीगड येथे सेवा बजावत असताना १९ ऑगस्ट रोजी आजाराने ...

Funeral at Janwad | जनवाड येथील जवानावर अंत्यसंस्कार

जनवाड येथील जवानावर अंत्यसंस्कार

निपाणी : जनवाड येथील जवान महेश महादेव घाटगे यांचे चंदीगड येथे सेवा बजावत असताना १९ ऑगस्ट रोजी आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी जनवाड येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

महेश हे सैन्यदलात २००४ साली दाखल झाले. हवालदार म्हणून ते गेल्या १६ वर्षांपासून सेवा बजावत होते. चंदीगड येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने त्यांचे लष्करी रुग्णालयात दुःखद निधन झाले. शुक्रवारी सकाळी चंदीगड येथील विशेष विमानाने पुणे येथील आर्मी हेडक्वाॅटरमध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्याठिकाणी बटालियनकडून मानवंदना दिल्यानंतर पुणे येथून जनवाड येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. येथील प्राथमिक शाळेमध्ये यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मराठा रेजिमेंट, बेळगावचे जेलाविंग, राजपुताना रायफल व महार रेजिमेंटच्या नंबर वन डेमो पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर वीरपत्नी महादेवी घाटगे यांना आर्मी पथकाने तिरंगा देऊन त्यांना सलामी दिली. महेश यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, सात वर्षांचा मुलगा पृथ्वीराज असा परिवार आहे.

फोटो : जनवाड येथे जवान महेश घाटगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Funeral at Janwad