शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने उघडण्याबाबत व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. तरीही सरकार व्यापार सुरु करायला परवानगी देत नाही. त्यामुळे दुकाने ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. तरीही सरकार व्यापार सुरु करायला परवानगी देत नाही. त्यामुळे दुकाने सुरु होतील, या आशेवर असलेल्या व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून, ते अत्यंत संतप्त झाले आहेत. दुकाने उघडण्याबाबत निर्णायक भूमिका घेण्यासाठी उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी बुधवारी दिली.

शासन व प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडूनही सरकारने निर्णय न घेणे म्हणजे व्यापाऱ्यांवर अन्याय आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे अपेक्षित होते. पण व्यापार्‍यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन विस्फोट होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशाराही ललित गांधी यांनी दिला. व्यापार्‍यांची निर्णायक भूमिका जाहीर करण्यासाठी शुक्रवारी राजारामपुरी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची व्यापक बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु, तिसरी लाट येईल म्हणून व्यापार किती काळ बंद ठेवणार? कोणताही शास्त्रीय आधार नसलेला तोडगा लॉकडाऊन कोरोनावर नाही, तर व्यापारी आणि कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर आघात करत आहे. व्यापारी आवश्यक ती खबरदारी घेतील. लसीकरण करून घेत आहेत. आता आणखी वाट बघणे शक्य नाही म्हणून ताबडतोब परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी ललित गांधी यांनी केली.