लपंडाव खेळताना हौदात पडून चारवर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST2021-04-20T04:26:59+5:302021-04-20T04:26:59+5:30

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, व्हंडकर कुटुंबीय स्वामी मळ्यात भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा गणेश हा अन्य मुलांसोबत लपंडाव खेळत होतो. ...

Four-year-old boy dies after falling into pool while playing Lapandav | लपंडाव खेळताना हौदात पडून चारवर्षीय बालकाचा मृत्यू

लपंडाव खेळताना हौदात पडून चारवर्षीय बालकाचा मृत्यू

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, व्हंडकर कुटुंबीय स्वामी मळ्यात भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा गणेश हा अन्य मुलांसोबत लपंडाव खेळत होतो. जिन्याच्या खाली लपत असताना तेथे असलेल्या हौदात त्याचा तोल गेल्याने तो पडला. काही वेळाने नातेवाइकांनी त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला; परंतु तो सापडत नव्हता. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातूनही त्याचा शोध सुुरू केला. दरम्यान, गणेश हा अमर साळुंखे यांच्या जिन्याखाली अडगळीत असलेल्या हौदात पडल्याचे निर्दशनास आले. त्याला नातेवाइकांनी तेथून बाहेर काढून तातडीने आय.जी.एम. रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांना गर्दी केली होती. गणेश याच्या आईने मोठा आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.

Web Title: Four-year-old boy dies after falling into pool while playing Lapandav