शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वीर सैनिकांना चार महिन्यात मिळणार जमिन: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:38 IST

वीर सैनिक, वीर माता यांचे जमीन मागणीचे प्रलंबित प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहीला आहे. यंदाच्या वषीर्ही आपण उद्दिष्ट पूर्ण करुन २ कोटीच्या पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट २ कोटीच्या पुढे नेऊ

कोल्हापूर : वीर सैनिक, वीर माता यांचे जमीन मागणीचे प्रलंबित प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहीला आहे. यंदाच्या वषीर्ही आपण उद्दिष्ट पूर्ण करुन २ कोटीच्या पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने, निवृत्त ब्रिगेडीयर विजय घोरपडे, निवृत्त कर्नल अमरसिह सावंत, निवृत्त कर्नल विलास सुळकुडे, निवृत्त कर्नल बी.डी. कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांच्या मुलांचा तसेच ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट काम करणा?्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. वीर माता-पित्यांचा आदरपूर्वक जागेवर जावून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माजी सैनिक त्यांचे नातेवाईक यांना मदतीचे धनादेश देण्यात आले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यातील माणसे मदत करणारी आहेत. संकट कुणावरही येवो ती धडाडीने मदतीसाठी पुढे येतात. याची प्रचिती महापुराच्या वेळी घेतली आहे. नागरिकांच्या मदत कायार्मुळे महापुरासारख्या संकटातून जिल्हा सावरला. यामध्ये माजी सैनिकदेखील कार्यामध्ये पुढे होते.डॉ. कलशेट्टी म्हणाले, देश रक्षणात सैनिक सदैव तत्पर असतात. त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी, कल्याणासाठी आपणही आघाडीवर असलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात ध्वजनिधीसाठी मदत करावी.सुभाष सासने म्हणाले, ध्वजनिधी संकलनामधून माजी सैनिकांच्या कुटुंबाचे कल्याण पुनर्वसनासाठी मदत केली जाते. गतवर्षी १ कोटी ६० लाख निधीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे.

यावर्षीही १ कोटी ६१ लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्यामधील दुसऱ्या महायुध्दातील ४६८ वीरपत्नींना १ कोटी ९८ लाखाची मदत करण्यात आली आहे. विविध ५० योजना राबविण्यात येत असून त्यासाठी १ कोटी ५१ लाखांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, घरबांधणी आदींचा समावेश आहे. निवृत्त कर्नल सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. वेदा सोनले यांनी स्मृतीगीत सादर केले. पूजा रेंगाळे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर पांगे यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर