शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

केएमटीला १०० बसेस देण्यास चार कंपन्या इच्छुक

By admin | Updated: June 14, 2014 01:26 IST

महिन्याभरात वर्क आॅर्डर : चार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘केएमटी’कडून निविदा फॉर्म घेतले

भारत चव्हाण, कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन विभागाकडे (केएमटी) घेण्यात येणाऱ्या नव्या कोऱ्या १०४ बसेसचा पुरवठा करण्यास चार नामवंत उत्पादक कंपन्या इच्छुक आहेत. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘केएमटी’कडून निविदा फॉर्म घेतले आहेत. येत्या सोमवारपर्यंत (१६ जून) निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख असून, पुढच्या चार-पाच दिवसांत टेक्निकल व फायनान्सियल बिड उघडून या महिनाअखेरीस वर्क आॅर्डर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्या बसेसच्या करासाठी प्रशासनाने पाच कोटींची तरतूदही केली आहे. केंद्रातील कॉँग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूर महापालिका (केएमटी) परिवहन विभागास १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. निधी मंजूर झाला, निविदा मागविल्या; परंतु केएमटीच्या ताफ्यात बसेस येण्यापूर्वी कॉँग्रेसची सत्ता गेली. त्यामुळे एकदा झालेल्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याने बसेस खरेदीची सर्व कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. आचारसंहितेपूर्वीच केएमटी प्रशासनाने बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख १६ जून आहे. आतापर्यंत चार कंपन्यांनी निविदा नेल्या आहेत. या कंपन्या बसेस पुरवठा करण्यास इच्छुक आहेत. १७ जून रोजी पहिल्यांदा टेक्निकल बिड उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर फायनान्सियल बिड उघडली जाणार आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंजूर निविदाधारक कंपनीला वर्क आॅर्डर दिली जाणार आहे. केंद्र सरकारची एक समिती असून, तिने ठरविलेल्या साच्यानुसार एक प्रोटोटाईप बस तयार करून दाखवायची आहे. त्याला समितीची मान्यता मिळताच पुढील प्रत्येक महिन्याला २५ याप्रमाणे पहिल्या टप्प्यात ७५ बसेसचा पुरवठा संबंधित कंपनीने करायचा आहे. दुसऱ्या टप्प्यात २९ बसेस पुरवायच्या आहेत. ज्यांनी निविदा भरल्या आहेत, त्या कंपन्यांची दिवसाला १० ते १५ बसेस बनविण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकदा प्रोटोटाईप बसला मंजुरी मिळाली की, दोन महिन्यांतच सर्व बसेस ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा आहे.